घटस्फोटानंतर शिखरची इन्स्टाग्रामवर भावूक स्टोरी, मुलाशी बोलताना धवनला काय वाटलं?

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Aesha Mukerji) यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतला. आयशाने एक इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या आणि शिखरच्या (Shikhar Dhawan Divorce) घटस्फोटाबद्दल माहिती दिली.

घटस्फोटानंतर शिखरची इन्स्टाग्रामवर भावूक स्टोरी, मुलाशी बोलताना धवनला काय वाटलं?
शिखर धवन मुलगा झोरावरसोबत

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या आयुष्यात मागील काही दिवसांपासून अक्षरश: वादळ आलं आहे. आधी पत्नी आयशा मुखर्जी (Aesha Mukerji) आणि त्याचा घटस्फोट, त्यानंतर आगामी टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान नाही. अशा दोन मोठ्या घटनांनी शिखरचं आयुष्य हादरलं असतानाही त्याने आयुष्यातील एक सुंदर क्षण इन्स्टाग्राम स्टोरीतून शेअर केला आहे. हा क्षण म्हणजे शिखर आणि त्याचा मुलगा झोरावर हे दोघेही व्हिडीओ कॉलवर एकमेकांशी बोलत आहे. यावेळी ते एकमेकांना किस देत असल्याची एक्शनही करत असून या क्षणाबद्दल बोलताना शिखरने हा दिवसभरातील सर्वात सुंदर क्षण असल्याचं म्हटलं आहे.

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. आयेशा शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली असून त्यांचा साभांळही शिखर करत होता सोबतच त्यांना असणारा झोरावर हातर दोघांचाही खास लाडका. पण आता दोघांच्या घटस्फोटानंतर झोरावरची कस्टडी नेमकी कोणाला मिळणार हे माहित नाही. पण शिखरचं मुलावर असणारं प्रेम कायमच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसतं. जे आज पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आलं.

Shikhar insta story

शिखरची इन्स्टाग्राम स्टोरी

आयशाची पोस्ट आणि शिखरचा घटस्फोट

शिखरच्या पत्नीने तिच्या आणि शिखरच्या घटस्फोटाची माहिती 6 सप्टेंबर रोजी इन्स्टग्राम पोस्टद्वारे दिली. या पोस्टमध्ये तिने अनेक भावनिक अशा गोष्टी लिहिल्या होत्या. दरम्यान आयशा आणि शिखर यांच्या नात्यात 2020 मध्ये तणाव निर्माण झाला असल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. यासोबतच आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शिखरचे फोटो काढून टाकले होते. त्यानंतर आता इन्स्टाग्रामवरच आयशाने घटस्फोटाची पोस्ट लिहित ही सर्व माहिती दिली आहे.

इतर बातम्या

गब्बरच्या आयुष्यातलं वादळ शमेना, पहिल्यांदा घटस्फोट आता BCCI कडून शिखर धवनला मोठा झटका

अजिंक्य रहाणेला संघातून कधी बाहेर कराव?, दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने दिलं उत्तर, म्हणाला…

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत सस्पेन्स संपला, BCCI सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य!

(Shikhar Dhawan got Emotional after talking to son Zorawar shares story on instagram)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI