गब्बरच्या आयुष्यातलं वादळ शमेना, पहिल्यांदा घटस्फोट आता BCCI कडून शिखर धवनला मोठा झटका

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 09, 2021 | 9:46 AM

पहिल्यांदा घटस्फोटाने शिखरचं वैयक्तिक आयुष्याचं नुकसान झालं आणि आता बीसीसीआयच्या निर्णयाने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतही मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे गब्बरच्या आयुष्यातलं वादळ काही केल्या शमायला तयार नाहीय.

गब्बरच्या आयुष्यातलं वादळ शमेना, पहिल्यांदा घटस्फोट आता BCCI कडून शिखर धवनला मोठा झटका
शिखर धवन

World Cup 2021 :  आगामी वर्ल्डकपसाठी (World Cup 2021) बीसीसीआयने (BCCI) काल भारताच्या 15 सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली. यामध्ये निवडकर्त्यांनी सगळ्यांना आश्चर्यचकित अन् काहीसा गोंधळात टाकणारा निर्णय घेतलाय. भारताचा टी ट्वेन्टी स्पेशालिस्ट तडाखेबाज फलंदाज शिखर धवनला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दोन दिवसांपूर्वीच त्याची पत्नी आयेशाने ‘गब्बर’ला घटस्फोट दिला. त्यामुळे शिखरच्या आयुष्यात वादळ आलं. पण आता बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी शिखरला वगळून त्याला दुसरा मोठा झटका दिलाय. पहिल्यांदा घटस्फोटाने शिखरचं वैयक्तिक आयुष्याचं नुकसान झालं आणि आता बीसीसीआयच्या निर्णयाने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतही मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे गब्बरच्या आयुष्यातलं वादळ काही केल्या शमायला तयार नाही, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

शिखर धवनच्या आयुष्यात वादळ, बीसीसीआयकडून झटका

दोन महिन्यांपूर्वी शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीमने श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी केली. पहिल्यांदाच कर्णधारपदाची संधी मिळालेल्या शिखरने टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून दिला. 3 सामन्यांच्या मालिकेत शिखरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2-1 अशी सरशी केली. तर टी ट्वेन्टी मालिकेत देखील भारतीय संघ लंकेला नडला. दोन महिन्यांपूर्वी कर्णधार असलेल्या प्रमुख खेळाडूला आज टी ट्वेन्टी संघातून वगळण्याचा बीसीसीआयचा निर्णय अनेकांच्या पचनी पडला नाहीय.

विराटची मैत्री कामी आली नाही

रोहित शर्माच्या साथीने गब्बर मैदानात उतरुन विरोधी संघाची धुलाई करत असतो. मात्र वर्ल्डकप स्पर्धेत धवनऐवजी आता के एल राहुलला संधी देण्यात आली आहे. शिखरची विराटशी खास गट्टी आहे. बालपणीपासूचे ते मित्र आहेत. दिल्लीपासून ते एकत्र खेळतात. पण विराटची मैत्रीही धवनला संघात स्थान देऊ शकली नाही.

धवनचं स्वप्न तुटलं

दुसरीकडे विराटचा आणखी एक हुकमी एक्का मोहम्मद सिराजला देखील संघात स्थान मिळालेलं नाही. विराट नेहमी सिराजसाठी आग्रही असतो, तो प्लेईंग 11 मध्ये असावा, यासाठी विराट नेहमी प्रयत्न करतो, पण विराटने यावेळी मात्र त्याच्या दोन मित्रांबद्दल कोणतीही करुणा दाखवली नाही. धवन आणि सिराजचं टी ट्वेन्टी वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न तुटलं आहे.

9 वर्षांच्या सुखी संसारानंतर गब्बरच्या आयुष्यात वादळ

शिखर धवनला त्याची पत्नी आयेशा मुखर्जीने घटस्फोट दिला आहे. सोशल मीडियावर आयेशा मुखर्जीने एक भावनिक पोस्ट लिहून घटस्फोटाशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत. शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. धवन आणि आयेशा यांना झोरावर नावाचा मुलगाही आहे. आयेशा शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. 9 वर्षाच्या सुखी संसारानंतर आयेशाने शिखरशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय.

वर्ल्डकपसाठी भारताचे 15 खेळाडू

(Shikhar Dhawan Dropped T20 World Cup Indian Squad BCCI announcement)

हे ही वाचा :

T20 World Cup : BCCI ची मोठी घोषणा, MS धोनीचं टीम इंडियात कमबॅक, भारताला पुन्हा विश्वविजेता बनविणार?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI