AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, GT vs PBKS, Orange cap : पंजाब किंग्ससमोर बलाढ्य गुजरातचा पराभव, ऑरेंज कॅपमध्ये शिखर धवनची आगेकूच

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया.

IPL 2022, GT vs PBKS, Orange cap : पंजाब किंग्ससमोर बलाढ्य गुजरातचा पराभव, ऑरेंज कॅपमध्ये शिखर धवनची आगेकूच
ऑरेंज कॅपमध्ये शिखर धवनची आगेकूचImage Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 04, 2022 | 9:00 AM
Share

मुंबई: आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) काल बलाढ्य गुजरात टायटन्सचा  (GT) पराभव केला. पंजाबने आठ विकेट आणि तब्बल 24 चेंडू राखून विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा स्पर्धेतील हा दुसरा पराभव आहे. आतापर्यंत दहा पैकी आठ सामने त्यांनी जिंकले आहेत. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने 10 पैकी पाच सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभव झाला आहे. प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी पंजाबला काल विजय आवश्यक होता. कालच्या विजयामुळे पंजाब किंग्सला दोन पॉइंटस मिळालेच आहेत. पंजाब किंग्सचे हिरो कागिसो रबाडा, सलामीवीर शिखर धवन, भानुका राजपक्षे आणि लिव्हिंगस्टोन आहेत. शिखर धवनने 53 चेंडूत नाबाद 62 आणि लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनच्या बॅटिंगमुळे चार ओव्हर आधीच मॅच संपली. त्याने नेहमीच्या स्टाइलमध्ये फटकेबाजी केली. लिव्हिंगस्टोनने दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया.

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल

आयपीएलच्या ऑरेंज कॅप टेबल पाहिल्यास अद्यापही ऑरेंज कॅपवर बटलर राज कायम आहे. जॉस बटलर पहिल्या क्रमांकावर असून त्याने 588 धावा काढल्या आहे. केएल राहुल हा दुसऱ्या क्रमांकावर असून 451 धावा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवनने आगेकूच केली आहे. त्याने 369 धावा काढल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा आहे. त्याने 324धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे. त्याने 324 धावा आतापर्यंत काढल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

शिखरच्या 53 चेंडूत 62 धावा

144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात चांगली झाली नाही. जॉनी बेयरस्टो अवघ्या एक रन्सवर आऊट झाला. मोहम्मद शमीने त्याला प्रदीप सांगवानकरवी झेलबाद केलं. पण त्यानंतर शिखर धवनने भानुका राजपक्षेच्या साथीने मिळून डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. राजपक्षे 28 चेंडूत 40 तर शिखरने 53 चेंडूत 62 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने तर 10 चेंडूत 30 धावा फटकावून चार षटक राखून मॅचच संपवून टाकली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार