
मुंबई : ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिकने (Umran Malik) श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला. उमरानने या सामन्यात 150 किमी पेक्षा अधिक वेगाने बॉल टाकला. उमरानने हा कारनामा श्रीलंकेच्या डावातील 17 व्या ओव्हरमध्ये केला. उमरानने 155 किमी वेगाने बॉल टाकला. या बॉलवर उमरानने दासून शनाकाला (Dasun Shanka) आऊट केलं. इतकंच नाही तर उमरानने जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड ब्रेक केला. (shoaib akhtar says if team india umran malik break my fastet delivery record then i will happy)
उमरान आता टीम इंडियाकडून वेगाने बॉल टाकणारा गोलंदाज ठरलाय. याआधी उमरानने दिल्ली विरुद्ध 157 किमीच्या वेगाने बॉल टाकून सर्वांचंच लक्ष वेधलं होतं.
उमरानसमोर आता वेगवान बॉल टाकणाऱ्या शोएब अख्तरच्या रेकॉर्ड आहे. शोएबने 2002 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 161.3 किमी वेगाने बॉल टाकला होता.
“उमरानने माझा रेकॉर्ड ब्रेक केला तर मला आनंद होईल. मात्र त्याने रेकॉर्ड तोडण्याच्या प्रयत्नात त्याने स्वत:ची हाडं तोडून घेऊ नये. म्हणजे त्याने फिट रहावं असा माझा अर्थ आहे”, असं अख्तर म्हणाला. “नशिबाची साथ असेल तर नक्कीच हा विक्रम मी मोडित काढेन”, असं उमरान याआधी म्हणाला होता.
दरम्यान टीम इंडियाने श्रीलंकेचा पहिला टी 20 सामन्यात 2 धावांनी थरारक विजय मिळवला. या सामन्यात उमरानने 4 ओव्हरमध्ये 27 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. दुसरा टी 20 सामना 5 जानेवारीला पुण्यात खेळवण्यात येणार आहे. उमरानकडून दुसऱ्या टी 20 मध्ये यापेक्षाही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.