AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण अफ्रिकेच्या पदरी पुन्हा निराशा, टेम्बा बावुमाने सांगितलं सामना कुठे गमावला?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेचा प्रवास उपांत्य फेरीतच थांबला. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने विजयासाठी 362 धावांचं आव्हान दिलं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ 312 धावाच करू शकला.

दक्षिण अफ्रिकेच्या पदरी पुन्हा निराशा, टेम्बा बावुमाने सांगितलं सामना कुठे गमावला?
| Updated on: Mar 05, 2025 | 10:55 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीतही दक्षिण अफ्रिका माथ्यावर लागलेला चोकर्सचा डाग काही पुसू शकला नाही. उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. रचिन रविंद्र आणि विल्यमसन यांनी शतकी खेळी करत संघाला 362 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. ही धावसंख्या गाठताना दक्षिण अफ्रिकेचा डाव गडगडला. डेविड मिलरने शतकी खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण 9 गडी गमवून 312 धावांपर्यंत मजल मारता आला. हा सामना न्यूझीलंडने 50 धावांनी जिंकला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील दक्षिण अफ्रिकेचा प्रवास येथेच थांबला. कर्णधार टेम्बा बावुमाने या पराभवानंतर आपलं म्हणणं मांडलं.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला, ‘मला वाटते की ते सरासरीपेक्षा जास्त होते. कदाचित जर 350 धावा असती तर आम्ही धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी स्वतःला पाठिंबा दिला असता. आज आमच्याकडे एक किंवा दोन भागीदारी झाल्या पण आम्हाला माझ्या किंवा रॅसीने पुढे जाऊन त्यांच्या दोन फलंदाजांनी जे केले त्याचे अनुकरण करण्याची गरज होती. त्यांनी सुरुवातीपासूनच आमच्यावर दबाव आणला.’

‘खरं सांगायचं तर 125 वर 1 विकेट अशी स्थिती होती. या क्षणी आम्हाला अधिक निर्णायक असायला हवे होते, विरोधी संघाला परत येण्याची दिली नसती तर बरं झालं असतं. आम्हाला सामन्यातील महत्त्वाच्या क्षणांची काळजी घेण्याची गरज होती.’, असं टेम्बा बावुमा याने पुढे सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...