AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

South Africa ODI Squad: दक्षिण अफ्रिकेने संघातून काढल्यानंतर वादाला फोडणी, नेमकं काय झालं?

ऑस्ट्रेलियन संघ 24 सप्टेंबरपासून दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यावर असून वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकन संघाची घोषणा केली आहे. मात्र यावरून वादाला फोडणी मिळाली आहे.

South Africa ODI Squad: दक्षिण अफ्रिकेने संघातून काढल्यानंतर वादाला फोडणी, नेमकं काय झालं?
South Africa ODI Squad: दक्षिण अफ्रिकेने संघातून काढल्यानंतर वादाला फोडणी, नेमकं काय झालं?Image Credit source: Getty Images
| Updated on: Sep 07, 2026 | 7:51 PM
Share

दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. तीन वर्षानंतर ऑस्ट्रेलियन संघ वनडे मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेत जाणार आहे. ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा मालिका विजयासाठी मैदानात उतरणार आहे. असं असताना क्रिकेटविश्वात संघाची घोषणा होण्यापूर्वी कमालीची उत्सुकता आहे. संघात कोण असेल? कोण नसेल? याबाबत चर्चा रंगते. संघात काही अनपेक्षित बदल दिसले की त्यावरून वाद होणं सहाजिकच आहे. दक्षिण अफ्रिकन संघाबाबत असं आता असं घडलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. यात युवा फंलदाज डेवाल्ड ब्रेव्हिस याला संघात स्थान मिळालं नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी निवड समितीवर आगपाखड केली आहे.

ब्रेव्हिससाठी वाद होण्याचं कारण काय?

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका दक्षिण अफ्रिकेसाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने ही तयारी असणार आहे. असं असताना या मालिकेत 23 वर्षीय आक्रमक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसला डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याच्या ऐवजी संघात डावखुरा फलंदाज टोनी डिजोर्जी याची निवड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दक्षिण अफ्रिकेन क्रिकेटप्रेमींनी ही बाब काही रूचलेली नाही. काही चाहत्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच काय तर त्या पोस्टखाली लिहिलं की, अशा परिस्थितीत पुढच्या वर्षी होणारा वर्ल्डकप काही जिंकत नाही.

निवड झालेल्या आणि न झालेल्या खेळाडूंचा फॉर्म पाहता ही टीका योग्यच आहे, असं म्हणायला हरकत नाही. नामिबिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध टी20 मालिकेत ब्रेव्हिसने 5 डावात 226 धावा केल्या होत्या. तर डिजोर्जी तीन सामन्यात खेळला पण काही खास करू शकला नाही. त्याने फक्त 41 धावा केल्या. ब्रेव्हिसने 9 वनडे सामन्यात 230 धावा केल्या आहेत. तर डिजोर्जीने 22 वनडे सामन्यात 705 धावा केल्या आहेत.

दक्षिण अफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनिएल बार्टमॅन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रीट्ज़के, गेराल्ड कोएत्ज़ी, क्विंटन डी कॉक, टोनी डी ज़ॉर्ज़ी, फॉर्च्यून फॉर्च्यून, मार्को यानसन, केशव महाराज, क्वेना मफाका, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, रयान रिकेलटन, ट्रिस्टन स्टब्स

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात