T20 WC Super 8: भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी दक्षिण अफ्रिकन संघाची घोषणा, या गोलंदाजाकडे कर्णधारपद

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीत भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. हा सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेने टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. ही मालिका15 मार्चपासून होणार आहे.

T20 WC Super 8: भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी दक्षिण अफ्रिकन संघाची घोषणा, या गोलंदाजाकडे कर्णधारपद
भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी दक्षिण अफ्रिकन संघाची घोषणा, या गोलंदाजाकडे कर्णधारपद
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 20, 2026 | 9:19 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीत भारताचा पहिलाच सामना दक्षिण अफ्रिकेशी आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे हा सामना अतितटीचा होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीचा दावा पक्का करण्याच मानस असणार आहे. या सामन्याला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना दक्षिण अफ्रिकन क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. हा संघ काही भारताविरुद्ध खेळणार नाही. तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर होणाऱ्या टी20 मालिकेसाठी आहे. या मालिकेत दक्षिण अफ्रिकेचा कर्णधारही बदलण्यात आला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा होताच दक्षिण अफ्रिकन संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका 15 मार्च ते 25 पर्यंत असणार आहे.

दक्षिण अफ्रिकन बोर्डाने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा या दौऱ्यासाठी केली आहे. या मालिकेसाठी संघाची जबाबदारी फिरकीपटू केशव महाराजच्या खांद्यावर दिली आहे. केशव महाराज या दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी कर्णधार एडन मार्करमची जागा घेईल. एडन मार्करम टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर काही दिवस आराम करेल. त्यानंतर आयपीएल स्पर्धेसाठी लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात रूजू होईल. आयपीएल स्पर्धा 26 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल स्पर्धा दोन महिने असणार आहे. मार्करम व्यतिरिक्त टी20 वर्ल्डकप संघातील बहुतांश खेळाडूंना या मालिकेसाठी आराम दिला गेला आहे. यापैकी बरेचसे खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेतली. दक्षिण अफ्रिकेचा महिला संघही न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

“ही मालिका टी20 वर्ल्डनंतर लगेच होत असल्याने बहुतेक खेळाडू मायदेशी परततील. ज्यामुळे खेळाडूंच्या या गटाला आंतरराष्ट्रीय वातावरणात पाऊल ठेवण्याची आणि या पातळीवर त्यांचे ध्येय दाखविण्याची उत्तम संधी निर्माण होईल,” असे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड म्हणाले.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ: केशव महाराज (कर्णधार), ओटनेल बार्टमन, इथान बॉच, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी जॉर्जी, कोन्नोर इस्टरहुझेन, डीआन फॉरेस्टर, जॉर्डन हरमन, रूबीन लिंडे, एक्योबानी मोकोएना, प्रेनेलन सुब्रयेन, एँडिल सिमलेन, लुथो सिपमला, जेसन स्मिथ

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us