AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : सुपर 8 फेरीत किती सामने जिंकले तर उपांत्य फेरीत स्थान मिळेल? जाणून घ्या गणित

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा मधला अंक सुरू झाला आहे. साखळी फेरीतील लढती संपल्या असून सुपर 8 फेरीचा थरार सुरू होणार आहे. या फेरीतून चार संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत. पण या टप्प्यात कसं गणित असेल तर जाणून घेऊयात.

T20 World Cup 2026 : सुपर 8 फेरीत किती सामने जिंकले तर उपांत्य फेरीत स्थान मिळेल? जाणून घ्या गणित
सुपर 8 फेरीत किती सामने जिंकले तर उपांत्य फेरीत स्थान मिळेल? जाणून घ्या गणित Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 20, 2026 | 6:19 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत आठ संघ पोहोचले आहेत. दोन गटात विभागणी झाली असून प्रत्येक गटात चार संघ आहे. गट 1 मध्ये भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. तर गट 2 मध्ये पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ आहे. प्रत्येक गटातील संघाच्या वाटेला एकूण तीन सामने येणार आहे. हे सामने त्या गटातील संघाशी होणार आहे. जसं की भारताचे सामने झिम्बाव्बे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेशी होईल. प्रत्येक गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे प्रत्येक संघाला उपांत्य फेरी गाठायची तर सुपर 8 फेरीत चांगली कामगिरी करणं भाग आहे. अन्यथा या स्पर्धेतील आव्हान सुपर 8 फेरीत संपुष्टात येईल. उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी प्रत्येक संघाला तीन सामन्यात काय करावं लागेल? कोणतं समीकरण जुळून आलं तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल? ते जाणून घ्या.

भारताचं समीकरण कसं असेल?

भारतीय संघाचं एक उदाहरण घेऊयात. इतर संघांनाही ही समीकरण लागून पडणार आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर समोर दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचं आव्हान असणार आहे. या तीन संघांना भारताने पराभूत केलं तर उपांत्य फेरीचं तिकीट थेट मिळेल, यात काही शंका नाही. पण तीन पैकी एखाद दुसरा पराभव झाला तर मात्र कठीण होऊ शकते. दोन सामन्यात पराभव झाला तर गाशा गुंडाळावा लागेल. त्यामुळे तसं समीकरण जुळून आलं तर काय?

भारताने तीन पैकी 2 सामन्यात विजय मिळवला तर उर्वरित संघांचे गुण महत्त्वाचे असतील. टॉपला असलेल्या संघाने 3 सामने जिंकले असतील आणि भारताने 2 सामने जिंकले तर उपांत्य फेरीत भारताला स्थान मिळेल. यात काही शंका नाही. पण टॉपच्या संघानेही 2 सामने जिंकले असतील तर मात्र गणित गुणांपेक्षा नेट रनरेटच्या आधारावर जुळून येईल. कारण अशा स्थितीत तीन संघांचे गुण समान होतील आणि नेट रनरेटवरच गणित पुढे सरकेल. त्यामुळे भारताला नुसता विजय मिळवून नाही तर नेट रनरेटचं गणितही सांभाळावं लागणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीचा थरार 21 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. पहिलाच सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला दक्षिण अफ्रिकेशी, 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेशी आणि तिसरा आणि शेवटचा सामना वेस्ट इंडिजशी 1 मार्चला होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 फेब्रुवारीला होतील. तर अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ