AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत पाकिस्तान सामन्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीचा विक्रम मोडला, नेमकं कारण काय?

भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की द्वंद्व असतं. मग स्पर्धेचा निकाल काहीही असो.. या सामन्यात विजय मिळवला तरी दोन्ही देशाच्या क्रीडाप्रेमींचा जीव थंड होतो. या सामन्याचं किती वेड आहे हे दिसून येते. प्रेक्षकसंख्येच्या आकडेवारीवरून पुन्हा हे अधोरेखित झालं आहे.

भारत पाकिस्तान सामन्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीचा विक्रम मोडला, नेमकं कारण काय?
भारत पाकिस्तान सामन्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीचा विक्रम मोडला, नेमकं कारण काय?Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 20, 2026 | 5:47 PM
Share

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात राजकीय दुरावा निर्माण झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. तसेच पाकिस्तानला प्रत्येक पातळीवर धडा शिकवण्याचा निश्चय दिसत आहे. त्याची प्रचिती क्रिकेटच्या मैदानातही दिसून आली आहे. भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिला. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सर्व सामने दुबईत झाले. त्यानंतर आशिया कप स्पर्धेत नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. हाच कित्ता टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कायम आहे. असं असताना दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार म्हंटलं उत्साह शिगेला पोहोचणार यात काही शंका नाही. पण या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने भारताविरूद्ध खेळणार नाही असा पवित्रा घेतला आहे. बांगलादेशवर अन्याय झाल्याचं कारण पुढे करत मोठा गाजावाजा केला होता. पण अखेर झुकले आणि भारताविरुद्ध सामना खेळले. आयसीसीच्या प्रयत्न यशस्वी ठरले आणि या सामन्याला मोठा प्रेक्षकवर्गही लाभला.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची अधिकृत डिजिटल आणि प्रसारण भागीदारी जिओस्टारकडे आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या पाच दिवसानंतर त्यांनी प्रेक्षकसंख्येची आकडेवारी जाहीर केली आहे. 15 फेब्रुवारीला पार पडलेल्या भारत पाकिस्तान सामन्याला डिजिटल आणि ऑनलाइन स्ट्रिमिंगद्वारे 16.3 कोटी प्रेक्षकसंख्या लाभली आहे. इतक्या लोकांनी हा सामना डिजिटल माध्यमातून पाहिल्याची नोंद झाली आहे. यात टीव्हीवर सामना पाहणाऱ्यांची संख्या नाही. त्यात ही संख्या जोडली गेली तर आकडा अजून फुगेल यात काही शंका नाही. आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी कधीही इतकी प्रेक्षकसंख्या लाभली नाही.

टी20 वर्ल्डकप अंतिम फेरीपेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या डिजिटल माधम्यातून लाभल्याचं कंपनीने आकडेवारी जाहीर करताना सांगितलं. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. पण त्यापेक्षाही जास्त प्रेक्षकवर्ग आता लाभला. त्या सामन्याच्या तुलनेत 56 टक्के अधिक डिजिटल व्ह्यूज मिळाले.

पाकिस्तानच्या भूमिकेमुळे असं झालं का?

भारत पाकिस्तान सामना रद्द होणार अशीच स्थिती आधी होती. मात्र त्यानंतर आयसीसीने यशस्वी मध्यस्थी केली आणि सामना पार पडला. त्यानंतर लाभलेली डिजिटल प्रेक्षकवर्गाची संख्या पाहता नेमकं काय कारण असू शकतं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ की पाकिस्तानचं बहिष्कार अस्त्र कामी आलं हे सांगणं कठीण आहे. वाढलेली संख्या ही पाकिस्तानच्या नाटकांमुळे झाली असावी असा अंदाज आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ