AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SA: शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज, डेब्यू सामन्यात 20 वर्षीय खेळाडूने मिळवून दिला विजय Video

दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड महिला संघात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती आणि षटकार मारला. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

NZ vs SA: शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज, डेब्यू सामन्यात 20 वर्षीय खेळाडूने मिळवून दिला विजय Video
NZ vs SA: शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज, डेब्यू सामन्यात 20 वर्षीय खेळाडूने मिळवून दिला विजय VideoImage Credit source: Getty Images
| Updated on: Mar 29, 2026 | 7:06 PM
Share

न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका महिला संघात पहिला वनडे सामना पार पडला. हा सामना दक्षिण अफ्रिकेने 2 गडी राखून जिंकला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि 50 षटकात सर्व गडी गमवून 268 धावा केल्या. तसेच विजयासाठी 269 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं आणि सामना जिंकला. दक्षिण अफ्रिकेने 2 गडी राखून हा विजय मिळवला आहे. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या 20 वर्षीय कायला रेनेकेनेचं या विजयात योगदान राहिलं. तिने पदार्पणाच्या सामन्यातच आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. तिने 32 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 42 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. चला जाणून घेऊयात शेवटच्या षटकात नेमकं काय झालं.

शेवटच्या षटकाचा थरार

दक्षिण अफ्रिकेला शेवटच्या षटकात म्हणजेच 6 चेंडूत 14 धावांची गरज होती. न्यूझीलंडकडून सुझी बेट्स गोलंदाजीसाठी आली. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी कायला रेनेकेने समोर होती. पहिल्या चेंडूवर तिने 1 धाव काढली आणि सेखुखुनेला स्ट्राईक दिली. तिनेही दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली आणि कायलाला स्ट्राईक दिली. आता 4 चेंडू आणि 12 धावांची गरज होती. कायलाने तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारला. त्यामुळे 3 चेंडूत 6 धावा अशी स्थिती आहे. पण सुझी बेट्सने त्यानंतर सलग दोन चेंडू निर्धाव टाकले. त्यामुळे 1 चेंडू आणि 6 धावा अशी स्थिती आली. शेवटच्या चेंडूवर कायलाने षटकार मारला आणि सामना जिंकवून दिला. कायलाला या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

कायला रेनेकेचा पदार्पणाचा सामना खास

कायला रेनेकेने पदार्पणाच्या सामन्यात षटकार मारून विजय मिळवून दिला. असं टी20 आणि वनडे क्रिकेटमधील पदार्पणात झालं आहे. 10 फेब्रुवारी रोजी टी20 पदार्पणाचा सामना पाकिस्तानविरुद्ध झाला होता. तेव्हाही शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवून दिला होता. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडेमधील पदार्पणाच्या सामन्यात तसंच केलं. 48 दिवसात कायलाने संघाला असा विजय मिळवून दिला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा