GT vs CSK IPL 2023 Final : ‘आम्हाला फरक पडत नाही’, फायनलआधी CSK च्या कोचच गुजरातला ओपन चॅलेंज

| Updated on: May 28, 2023 | 6:53 PM

GT vs CSK IPL 2023 Final : CSK चे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी काय म्हटलय?. दोन्ही टीम्सनी सीजनमध्ये शानदार खेळ दाखवलाय. गुजरात टायटन्सने मागच्यावर्षी डेब्यु सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सला नमवून आयपीएलच जेतेपद पटकावलं होतं.

GT vs CSK IPL 2023 Final : आम्हाला फरक पडत नाही, फायनलआधी CSK च्या कोचच गुजरातला ओपन चॅलेंज
CSK Coach stephen fleming IPL 2023
Image Credit source: IPL
Follow us on

अहमदाबाद : चेन्नई सुपर किंग्स आज आयपीएलमधल्या पाचव्या विजेतेपदासाठी भिडणार आहे. त्यांच्यासमोर विद्यमान चॅम्पियन गुजरात टायटन्सच आव्हान आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच होणार आहे. या फायनल मॅचआधी चेन्नईचे कोच स्टिफन फ्लेमिंग यांनी हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सला खुल आव्हान दिलय. फायनलमध्ये कशीही परिस्थिती असो, आमची टीम प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार आहे, असं चेन्नईचे कोच फ्लेमिंग म्हणाले.

चेन्नई आपल्या 14 सीजनमध्ये 10 व्यांदा फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गुजरात टायटन्सची फायनल खेळण्याची ही दुसरीवेळ आहे. दोन्ही टीम्सनी सीजनमध्ये शानदार खेळ दाखवलाय. गुजरात टायटन्सने मागच्यावर्षी डेब्यु सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सला नमवून आयपीएलच जेतेपद पटकावलं होतं.


फरक पडत नाही

क्रिकेटमध्ये परिस्थिती महत्वाची असते. पीच कसा आहे? मॅच कुठे होणार आहे? कोणाच्या घरच्या मैदानावर मॅच होणार आहे? या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. फायनलचा सामना गुजरातच्या घरच्या मैदानावर आहे. सहाजिकच त्यांचा जास्त फायदा असणार आहे.

पण चेन्नईच्या टीमला याने फरक पडत नाही. चेन्नईच्या टीमला घराच्या बाहेर खेळताना काही अडचणी आल्या. त्यांनी संघर्ष केला, असं फ्लेमिंग म्हणाले. “आता आम्ही फायनलमध्ये काय परिस्थिती असेल? याची चिंता करत नाही. मानसिक दृष्ट्या आम्ही पहिल्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहोत” असं फ्लेमिंग म्हणाले.

चेन्नईची टीम शेवटची फायनल कधी खेळलेली?

ही मोठी संधी असून टीम उत्साहात आहे, असं फ्लेमिंग यांनी म्हटलय. आमच्याकडे चांगले खेळाडू असून फायनलमध्ये गुजरातच्या प्रत्येक आव्हान सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं फ्लेमिंग यांनी सांगितलं. चेन्नईने आपला शेवटचा फायनल सामना 2021 मध्ये खेळला होता. कोलकाता नाइट रायडर्सला हरवून विजेतेपद मिळवलं होतं. मागचा सीजन सीएसकेसाठी खराब होता. चेन्नईची टीम प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नव्हती.