AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धा सुरू असताना पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला, हैदराबादचा कर्णधार परतणार की नाही?

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद विजयी ट्रॅकवर परतली आहे. इशान किशनच्या नेतृत्वात दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी झाली. पण असं असताना पॅट कमिन्सबाबत एक धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. चला जाणून घेऊयात..

IPL 2026 स्पर्धा सुरू असताना पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला, हैदराबादचा कर्णधार परतणार की नाही?
IPL 2026 स्पर्धा सुरू असताना पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला, हैदराबादचा कर्णधार परतणार की नाही?Image Credit source: PTI
| Updated on: Apr 04, 2026 | 6:05 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत कर्णधारपदाची धुरा इशान किशनच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पण तरी पॅट कमिन्स लवकर मैदानात परतेल याची प्रतीक्षा केली जात आहे. कारण दुखापतीमुळे सुरूवातीच्या काही सामन्यात पॅट कमिन्स खेळणार नाही. पण सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात असल्याने एक पाठिंबा होता. पण अचानक पॅट कमिन्स मायदेशी परतला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पॅट कमिन्स भारतात आला होता. पण दोन सामने झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. एका रिपोर्टनुसार, पॅट कमिन्स आता एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परतणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस इशान किशनला कर्णधारपदाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.

पॅट कमिन्स मायदेशी परतण्याचं कारण काय?

ईएसपीएन-क्रिकेइंफोच्या रिपोर्टनुसार, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स पाठिच्या दुखापतीने त्रस्त होता. मागच्या एक वर्षापासून त्याला पाठदुखीचा त्रास आहे. त्यामुळे जुलै 2025 पासून फक्त एकच सामना खेळला आहे. त्याने एशेज कसोटी मालिकेतील फक्त एका सामन्यात भाग घेतला होता. त्यानंतर संघाबाहेर गेला होता. त्यानंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला मुकला. आता स्पर्धेत खेळण्यासाठी पुन्हा एकदा पाठिच्या दुखापतीची तपासणी करण्यासाठी मायदेशी परतला आहे. ऑस्ट्रेलियाला गेल्याने पॅट कमिन्स आणखी काही सामन्यांना मुकणार आहे. रिपोर्टनुसार, पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियात फायनल स्कॅन करेल आणि त्यात सर्वकाही ठीक असेल तर 17 एप्रिलला पुन्हा एकदा परतेल.

पॅट कमिन्स किती सामने खेळणार नाही?

पॅट कमिन्सची सध्याची स्थिती पाहता कमीत कमी चार सामने मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता थेट 21 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत हैदराबादची गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 200 पार धावा करूनही रोखता आलं नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर कोलकाताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. आता पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत हैदराबादचा संघ राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा