
T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुपर-8 चा राऊंड सुरु आहे. एकाबाजूला ग्रुप 1 मधील स्थिती रंगतदार बनली आहे. त्याचवेळी ग्रुप 2 मधून दोन टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचल्या आहेत. आधी इंग्लंड USA ला हरवून सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. आता त्या पाठोपाठ दुसरी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजला 3 विकेटनी हरवून सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं. आतापर्यंत अनेकदा मोक्याच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेची टीम चुकते हे दिसून आलय. पण आज अस झालं नाही. त्यांनी वेस्ट इंडिडजवर 3 विकेटने विजय मिळवला. ग्रुप 2 मधून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 135 धावा केल्या. इतक्या महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेज आणि काइल मायर्स या दोघांचा अपवाद वगळता कोणी काही खास केलं नाही. दोघांमध्ये 65 चेंडूत 81 धावांची भागीदारी झाली. परिणामी कॅरेबियाई टीमला 135 धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं.
कोणी वेस्ट इंडिजला रोखलं?
वेस्ट इंडिजला 135 वर रोखण्यात दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सीच योगदान महत्त्वाच होतं. त्याने 4 ओव्हरमध्ये 27 रन्स देऊन 3 विकेट काढले. या दरम्यान त्याने T20 क्रिकेटमध्ये 300 विकेट पूर्ण केले. शम्सी शिवाय यानसन, मार्करम, महाराज आणि रबाडाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात एकूण 6 गोलंदाज वापरले. त्यात नॉर्खिया सोडून सर्वांना विकेट मिळाला.
पावसानंतर काय टार्गेट होतं?
दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 136 धावांच टार्गेट होतं. दक्षिण आफ्रिकेची चांगली सुरुवात झाली नाही. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून त्यांनी 15 धावा केल्या. पावसामुळे सामना थांबवावा लागला. त्यानंतर मॅच सुरु झाली. त्यावेळी ओव्हर कमी करण्यात आल्या. डकवर्थ लुईसनुसार वेस्ट इंडिजला नवीन टार्गेट देण्यात आलं. 3 ओव्हर कमी झाल्या. दक्षिण आफ्रिकेला 17 ओव्हर्समध्ये 123 धावांच टार्गेट मिळालं. त्यात 15 धावा त्यांनी केल्या होत्या. म्हणजे 90 चेंडूत त्यांना 108 धावा करायच्या होत्या. 8 विकेट शिल्लक होत्या.
वेस्ट इंडिजने फायटिंग स्पिरिट दाखवलं
पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला. त्यावेळी असं वाटलं की, दक्षिण आफ्रिका सामना एकतर्फी करेल. पण असं झालं नाही. मॅचमध्ये वेस्ट इंडिजने फायटिंग स्पिरिट दाखवलं. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला सहजतेने चेज करु दिलं नाही. त्यामुळेच सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला.
लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी किती धावा हव्या होत्या?
पावसानंतर खेळ सुरु झाला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 108 धावा करताना 5 विकेट गमावले. दक्षिण आफ्रिका सामना हरणार असही एक क्षण वाटलेलं. लास्ट ओव्हरमध्ये त्यांना 6 चेंडूत 5 धावा करायच्या होत्या. मार्को यानसनने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स मारुन टीमला विजय मिळवून दिला.