AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलाकेंद्रातून फोन, नृत्याची आवड पूर्ण करण्यासाठी बीडमध्ये आली अन् नंतर जे काही घडलं… माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर

नृत्याच्या आमिषाने बारामती येथील तरुणीला अंबाजोगाईत बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पायल कलाकेंद्राच्या बदामबाई गोकुळने तिला फसून, मारहाण करत पुरुषांच्या हवाली केले.

कलाकेंद्रातून फोन, नृत्याची आवड पूर्ण करण्यासाठी बीडमध्ये आली अन् नंतर जे काही घडलं... माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर
women
| Updated on: Dec 17, 2025 | 10:27 AM
Share

नृत्याची आवड असलेल्या एका निष्पाप तरुणीला कलेचे आमिष दाखवून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बारामती येथील तरुणीला अंबाजोगाईत आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी एका मुख्य संशयित महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलेच्या नावाखाली फसवणूक

बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, २४ एप्रिल २०२५ रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ नावाच्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला होता. आमच्या पायल कलाकेंद्रामध्ये नृत्यासाठी मुलींची गरज आहे. तुमच्या मुलीला तिथे नृत्याचे प्रशिक्षण मिळेल आणि चांगला पगारही मिळेल, असे खोटे आमिष तिने आईला दाखवले. घरची परिस्थिती आणि मुलीची आवड लक्षात घेता आईने तिला अंबाजोगाईला पाठवण्याचा निर्णय घेतला.

मारहाण आणि बलात्कार

पीडित मुलगी अंबाजोगाईत पोहोचल्यानंतर तिला पायल कलाकेंद्र येथे नेण्यात आले. मात्र, तिथले वातावरण पाहून तरुणीने तिथे राहण्यास आणि काम करण्यास स्पष्ट नकार दिला. या रागातून बदामबाई आणि तिच्या इतर दोन साथीदारांनी पीडितेला दया न माया दाखवता तिला बेदम मारहाण केली. तिला जबरदस्तीने शहरातील साई लॉज येथे नेण्यात आले. तिथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या हवाली केले. यानंतर ती स्वतः तिथून निघून गेली. या लॉजवर मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.

या अत्याचारानंतर नराधमांनी पीडितेला पुन्हा पायल कलाकेंद्र येथे आणून सोडले. तिथे तिला डांबून ठेवून वेश्याव्यवसाय करण्यासाठी धमकावण्यात आले. मात्र, पीडितेने हिंमत न हारता गुप्तपणे आपल्या आईशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार रडत सांगितला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आईने तात्काळ अंबाजोगाई गाठले. त्यानंतर स्थानिक मदतीने मुलीची तिथून सुटका करून तिला बारामतीला सुरक्षित आणले.

परिसरात मोठी खळबळ

यानंतर पीडितेच्या आईने सुरुवातीला बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एक अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे कार्यक्षेत्र अंबाजोगाई असल्याने हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. या आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) बलात्कारासह, मारहाण आणि धमकावण्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणातील पायल कलाकेंद्र आणि साई लॉजच्या मालकांचीही चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या पोलीस आरोपींच्या मागावर असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी