
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात आज सामना होणार आहे. टीम इंडिया आणि बांगलादेशचा सामना अँटिग्वा या ठिकाणी होणार आहे. या सामन्यावर पावसाचं दाट संकट असणार आहे. याआधी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश सामन्यामध्येही पावसाने हजेरी लावली होती. तो सामना पावसामुळे डकवर्थ लुईस नुसार कांगारूंनी जिंकला होता.तर आज होणाऱ्या सुपर-8 मधील सामन्यासाठी तुम्ही ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला नक्की मदत होऊ शकते. बांगलादेश संघाला हा सामना जिंकण्याची गरज आहे. कारण पहिल्या सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बांगलादेश आपली सर्व ताकद लावून खेळेल. टीम इंडियाचे सर्वच खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने बांगलादेश संघासाठी फार मोठं आव्हान असणार आहे.
कीपर- रिषभ पंत. फलंदाज- रोहित शर्मा, विराट कोहली सूर्यकुमार यादव, तौहीद हृदय. गोलंदाज- जसप्रीत बुमराह, मुस्तफिजुर रहमान आणि अष्टपैलू खेळाडू- हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शाकिब अल हसन, रिशाद हुसेन. या संघातमधील जसप्रीत बुमराह याला उपकर्णधार तर हार्दिक पंड्या याला कर्णधार करावं.
अँटिग्वामधील पिच हा गोलंदाजांसाठी चागलं असणार आहे. पहिल्या डावात जो संघ फलंदाजी करेल त्या संघाला जड जावू शकतं. मात्र दुसऱ्या डावात फलंदाजांनाही काही प्रमाणात पूरक ठरेल. या सामन्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. वर्ल्ड कप सुरू झाल्यापासून विराट कोहली अपयशी ठरला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्याकडून सर्वांना अपेक्षा असणार आहेत.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (WK), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
बांगलादेश : तनझिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हसन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, तौहीद हृदय, महमुदुल्ला, झाकीर अली, तन्झिद हसन शाकिब, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.