
एडिलेड: टीम इंडियाच T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया ग्रुप 2 मध्ये टॉपवर आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. मेलबर्नच्या मैदानात टीम इंडिया सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या इरायद्याने उतरेल. या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडिया एडिलेडहून मेलबर्नला पोहोचली आहे.
5 नोव्हेंबरचा दिवस खास
या महत्त्वाच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी 5 नोव्हेंबरचा दिवस खास असणार आहे. कारण या दिवशी टीम इंडियाचा आधारस्तंभ विराट कोहलीचा बर्थ डे आहे. विराट कोहली 33 व्या वर्षात पदार्पण करेल. सध्या विराट कोहली वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. बर्थ डे च्या आधी शुक्रवारी फॅन्सनी एडिलेड एयरपोर्टवर विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अशा स्वीट सरप्राइजची अपेक्षा नसेल
फॅन्सच्या हातात कोहलीच्या नावाचे मोठमोठे पोस्टर्स होते. हे पोस्टर्स घेऊन फॅन्स एयरपोर्ट बाहेर उभे होते. एयरपोर्टचा परिसर कोहली-कोहलीच्या नावाने दुमदुमला. विराट कोहलीने सुद्धा चाहत्यांकडून अशा स्वीट सरप्राइजची अपेक्षा केली नसेल.
adelaide airport
कोहलीसाठी सुद्धा तो खास दिवस
ऑस्ट्रेलियात सुरु असलेला यंदाचा टी 20 वर्ल्ड कप विराट कोहलीसाठी सुद्धा खास आहे. कारण यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. चार सामन्यात विराटने 144.73 च्या स्ट्राइक रेटने 220 धावा फटकावल्या आहेत. चार पैकी तीन सामन्यात त्याने अर्धशतक झळकावली आहेत. पाकिस्तान विरुद्ध नाबाद 82 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. नेदरलँड्स विरुद्ध नाबाद 62, बांग्लादेश विरुद्ध त्याने नाबाद 64 धावा फटकावल्या. विराटच्या या तिन्ही हाफ सेंच्युरी मॅचविनिंग खेळी ठरल्या आहेत. त्यामुळे विराटचा उद्याचा बर्थ डे त्याच्यासाठी खास असेल.