Rohit sharma कडून चुका झाल्या असं हार्दिक पंड्याला वाटतं का? कॅप्टन बनताच म्हणाला…..

| Updated on: Nov 16, 2022 | 12:35 PM

Hardik pandya कॅप्टन बनताच बोलून गेला एक मोठी गोष्ट

Rohit sharma कडून चुका झाल्या असं हार्दिक पंड्याला वाटतं का? कॅप्टन बनताच म्हणाला.....
hardik-pandya
Image Credit source: PTI
Follow us on

वेलिंग्टन: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच सेमीफायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलं. टीम इंडिया आता न्यूझीलंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये असून तिथे तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी 20 सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व हार्दिक पंड्याकडे आहे. हार्दिक पंड्याने कॅप्टन बनल्यानंतर एक महत्त्वाच विधान केलय.

“टी 20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धा होऊन गेलीय. आता पुढे पाहण्याची गरज आहे. आता चूका सुधारण्याची वेळ आहे” हार्दिक पंड्याच हे विधान कुठे ना कुठे रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतय.

हार्दिक पंड्या नेमकं काय म्हणाला?

वेलिंग्टनमध्ये टी 20 सीरीज ट्रॉफीच्या अनावरणाप्रसंगी हार्दिकने हे विधान केलं. “टी 20 वर्ल्ड कपमुळे आमच्यात निराशा आहे. पण आम्ही प्रोफेशनल आहोत. यश मिळाल्यानंतर जसे आपण पुढे जातो, तसं आता निराशेवर मात करण्याची आवश्यकता आहे. आम्हाला अजून चांगली कामगिरी करावी लागेल. चूका सुधाराव्या लागतील” असं हार्दिक म्हणाला.

रोहित शर्माने टी 20 मध्ये काय चूका केल्या?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना टीम इंडियाकडून काही चूका झाल्या. सर्वात मोठी चूक सेमीफायनलमध्ये झाली. ज्यात इंग्लंडच्या टीमने भारतावर 10 विकेट राखून विजय मिळवला. भारताने इंग्लंड विरुद्ध 168 धावा फटकावल्या. पण पहिल्या 10 ओव्हरमध्ये धीमा खेळ केला. रोहित शर्माने 100 च्या स्ट्राइक रेटने सुद्धा धावा बनवल्या नाहीत. रोहित शर्मा आक्रमक क्रिकेट खेळण्याबद्दल बोलत होता. पण तोच दबावाखाली खेळताना दिसला.

न्यूझीलंडमध्ये नवी टीम इंडिया

टी 20 वर्ल्ड कपमधील अपयशानंतर सिनियर खेळाडू मायदेशी परतले आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू न्यूझीलंडमध्ये सीरीज खेळणार आहेत. ऋषभ पंत या टीमचा उपकर्णधार आहे. संजू सॅमसन, इशान किशन या टीममध्ये आहेत. या सीरीजमध्ये काही नवीन गोष्टी पहायला मिळू शकतात.

न्यूझीलंड सीरीजमध्ये टीम इंडियाचा कार्यक्रम

पहिली टी 20-18 नोव्हेंबर

दूसरी टी 20-20 नोव्हेंबर

तीसरी टी 20-22 नोव्हेंबर