IND vs PAK: मॅथ्यू हेडनच्या मुलीने पाकिस्तानी गोलंदाजाच्या खांद्यावर ठेवलं डोकं, खास क्षण कॅमेऱ्यात कैद

IND vs PAK: टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेलेल्या पाकिस्तानी गोलंदाजाच काय चाललय?

IND vs PAK: मॅथ्यू हेडनच्या मुलीने पाकिस्तानी गोलंदाजाच्या खांद्यावर ठेवलं डोकं, खास क्षण कॅमेऱ्यात कैद
met matthew hayden daughter
| Updated on: Oct 25, 2022 | 3:29 PM

मेलबर्न: पाकिस्तानच्या गोटात सध्या शांतता आहे. कारण टीम इंडियाने रविवारी मेलबर्नमध्ये पाकिस्तानी टीमवर विजय मिळवला. टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवून सुपर 12 राऊंडमध्ये अभियान सुरु केलय. भारताच्या या विजयी कामगिरीनंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये सन्नाटा पसरला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता.

सगळीच समीकरणं बदलून टाकली

या मॅचमध्ये एकवेळ पाकिस्तानची बाजू सरस वाटत होती. भारताच्या हातून सामना निसटलाय अशी स्थिती होती. पण विराट कोहलीच्या तुफानी बॅटिंगने सगळीच समीकरणं बदलून टाकली. पाकिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला. पाकिस्तानला हा पराभव पचवता येत नाहीय.

एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी गोलंदाज शहनवाज दहानीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये शहनवाज दहानी पाकिस्तानचे बॅटिंग कोच मॅथ्यू हेडनच्या मुलीसोबत दिसत आहे.

थेट टीममध्ये तो नाहीय, पण….

दहानी मेलबर्नमध्ये हेडनची मुलगी ग्रेस आणि मुलासोबत दिसला. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानचा हा फोटो असल्याचा दावा केला जातोय. दहानी पाकिस्तानच्या 15 सदस्यीय वर्ल्ड कप टीमचा भाग नाहीय. राखीव खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.

Follow Us