AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election | कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील सर्वात मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट

Vidhan Parishad Election | कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील सर्वात मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट

| Updated on: Jun 01, 2026 | 5:30 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यातील 17 जागांवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी थेट लढती रंगणार आहेत. प्रमुख मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यातील 17 जागांवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी थेट लढती रंगणार आहेत. प्रमुख मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत आहे.
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघात भाजपचे अरुण लखानी आणि काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांच्यात थेट सामना होणार आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यासमोर काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल आव्हान उभे करणार आहेत. तर अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-सातारा मतदारसंघात भाजपचे धैर्यशील कदम यांच्याविरोधात शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील मैदानात उतरले आहेत. सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि काँग्रेसचे फत्तेपूरकर यांच्यात मुकाबला होणार आहे. अहिल्यानगरमध्ये नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर शरद पवार गटाच्या राणी लंके यांचे आव्हान असणार आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाट आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या देवयानी डोणगावकर यांच्यात थेट लढत होणार आहे. तर नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर आणि काँग्रेसचे माधवराव जळगावकर आमनेसामने येणार आहेत. एकूणच, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार असून अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

Published on: Jun 01, 2026 05:30 PM

Follow Us
Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग.

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होणार, एनसीपीच्या मंत्र्याचा मोठा दावा; 29 जुलैनंतर….

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होणार, एनसीपीच्या मंत्र्याचा मोठा दावा; 29 जुलैनंतर…

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला.

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच….

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच…

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले.

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले