IND VS CAN : फ्लोरिडात येताच टीम इंडियाला बसला धक्का, शेवटच्या सामन्याआधी काय झालं? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. हा औपचारिक सामना असला तरी टीम इंडियाला खेळाडूंची चाचपणी करण्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र भारतीय संघ फ्लोरिडात दाखल होताच फटका बसला आहे. या सामन्यापूर्वीचा सराव सामना रद्द करावा लागला आहे. इतकंच काय तर कॅनडाविरुद्धचा सामना होईल की नाही याबाबतही शंका आहे.

IND VS CAN : फ्लोरिडात येताच टीम इंडियाला बसला धक्का, शेवटच्या सामन्याआधी काय झालं? जाणून घ्या
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 9:42 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील तीन सामने जिंकत भारताने साखळी फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे साखळी फेरीतील चौथा सामना औपचारिक होता. भारत आणि कॅनडा यांच्यात 15 जूनला फ्लोरिडात सामना होणार आहे. यासाठी भारतीय संघ न्यूयॉर्कमधून फ्लोरिडात दाखल झाला आहे. सुपर 8 फेरीपूर्वी खेळाडूंची चाचपणी करण्यासाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. फ्लोरिडातील खराब हवामानामुळे कॅनडाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला सराव रद्द करावा लागला. तर फ्लोरीडातील हवामान पाहता सामन्यावरही पावसाचं सावट आहे. फ्लोरिडामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वादळांसह मुसळधार पाऊस पडत आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील हा सामना 15 जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे. हवामान विभागाने पुढील 2 दिवस पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

भारताने साखळी फेरीतील पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवून सुपर 8 फेरीत स्थान मिळवलं आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडला, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला आणि तिसऱ्या सामन्यात अमेरिकेला पराभूत केलं आणि सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. आता सुपर 8 फेरीत भारताने तीन पैकी दोन सामने जिंकणं गरजेचं आहे. तेव्हाच उपांत्य फेरीत स्थान मिळू शकतं.

सुपर 8 फेरीत टीम इंडिया कोणत्या संघाशी सामना करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. टीम इंडियाचा सुपर 8 फेरीतील सामना अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशशी होणार आहे. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचं ठरलं आहे. तर बांगलादेशचा सुपर 8 फेरीतील स्थान जवळपास निश्चित आहे.अशा परिस्थितीत कॅनडासोबतचा सामनाही रद्द झाल्यास सुपर-8 फेरीपूर्वी टीम इंडियाच्या तयारीला मोठा फटका बसू शकतो.

दोन्ही संघांचे खेळाडू

कॅनडा संघ: आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), कलीम सना, डिलन हेलिगर, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन, रेयान पठाण, निखिल दत्ता, ऋषीव राघव जोशी, दिलप्रीत बाजवा.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन , युझवेंद्र चहल.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.