
भारत आणि पाकिस्तामधील सामना क्रिकेट प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरते. आताही वर्ल्ड कपमध्ये झालेला भारत-पाक सामना एकदम थरारक आणि श्वास रोखून धरणारा होता. भारताला अवघ्या 119 धावांवर गुंडाळलं होतं, भारताचा वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघ आणखीन एक पराभव करणाक असं चित्र झालं होतं. मात्र भारतीय खेळाडूंनी आपली संपूर्ण ताकद लावत हा सामना आपल्या पारड्यात झुकवला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचं ब्रह्मास्त्र असलेला वेगवान गोलंदाज हा जसप्रीत बुमराह मॅचविनर खेळाडू ठरला. गडी कायम जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडतो तेव्हा संकटमोचक म्हणून धावून येतो. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातही त्याने आपला दांडपट्टा चालवला आणि सामना आपल्या बाजुने खेचला. याच मॅचविनरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यानंतर जसप्रीत बुमराह याची पत्नी संजना हिने त्याची मुलाखत घेतली. आम्ही दबावामध्ये असताना विजय मिळवला याचा आनंद आहे. आम्ही घाबरलो नाहीत कारण त्या पिचवर धावा काढणं कठिण जात होतं. एकत्र येत आम्ही लढलो आणि विजय संपादित केल्याचं जसप्रीत बुमराहने सांगितलं. आयसीसी डिजिटल इनसाइडर आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून बुमराहची पत्नी संजना गणेशन काम पाहते.
Sanjana bhabhi asked, “What’s for Dinner”
“I Cooked Pakistan” replied Bumrah 🥵#JaspritBumrah | #INDvsPAK pic.twitter.com/fEwHgIc87C
— CricWatcher (@CricWatcher11) June 10, 2024
मुलाखत संपत आल्यावर बुमराह संजनाला म्हणाला, की तीन मिनिटांनी आपण भेटणार आहोत. यावर संजनानेही त्याला, आजच डिनरमध्ये काय आहे असा मजेशीर प्रश्न त्याला केला. दोघांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बुमराह भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज असून कित्येक सामने आपल्या एकट्याच्या गोलंदाजीवर भारतीय संघाला काढून दिले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. फक्त याच नाहीतर आयर्लंडलविरूद्धही झालेल्या सामन्यामध्ये हा किताब पटकवला. वर्ल्डकपच्या सलग दोन सामन्यांमध्ये बुमराह या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग