AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagur Nagar Parishad Election : 30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा मार्ग मोकळा, सरोज अहिरे यांची प्रतिक्रिया

Bhagur Nagar Parishad Election : 30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा मार्ग मोकळा, सरोज अहिरे यांची प्रतिक्रिया

| Updated on: Dec 21, 2025 | 12:51 PM
Share

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी भगूर नगरपरिषद निवडणुकीतील प्रेरणा बलकवडे यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 30 वर्षांचा राजकीय वनवास संपल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेने दडपशाहीचे राजकारण संपवून विकासाला संधी दिल्याने, त्या भगूरच्या जनतेचे आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतात.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनी भगूर नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. भगूरच्या जनतेने 30 वर्षांचा वनवास संपवून प्रेरणा बलकवडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले. जनता सुज्ञ असून त्यांनी 25-30 वर्षांचे दडपशाहीचे राजकारण संपवून भगूरमध्ये एका चांगल्या बदलाची सुरुवात केली आहे, असे अहिरे म्हणाल्या. या विजयामुळे विकास कामांचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगत, त्यांनी भगूरच्या मायबाप जनतेचे आणि पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. यात भारतीय जनता पक्षाचे गिरीशभाऊ पालवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. राष्ट्रवादी अजित दादा यांच्या राष्ट्रवादीला भगूर नगरपरिषदेमध्ये ऐतिहासिक विजय मिळाला असून, जवळपास 25 वर्षांच्या संघर्षानंतर पक्षाने आपले पहिले खाते उघडले आहे.

Published on: Dec 21, 2025 12:51 PM