T20 WC 2026: सुपर 8 फेरीतील आठ संघ निश्चित, पाकिस्तानची लढत कोणाशी ते ठरलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने शेवटच्या टप्प्यात आहेत. मात्र त्या आधीच सुपर 8 फेरीचे संघ ठरले आहेत. पाकिस्तानने नामिबियाला पराभूत केलं आणि सुपर 8 फेरीत जागा मिळवणारा शेवटचा संघ ठरला आहे.

T20 WC 2026: सुपर 8 फेरीतील आठ संघ निश्चित, पाकिस्तानची लढत कोणाशी ते ठरलं
सुपर 8 फेरीतील आठ संघ निश्चित, पाकिस्तानची लढत कोणाशी ते ठरलं
Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 18, 2026 | 6:19 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. या स्पर्धेत सर्वात मोठा उलटफेरही नोंदवला गेला. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया बाहेर काढत सुपर 8 फेरीत जागा मिळवली. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. दिग्गज संघ पहिल्या फेरीतच बाद झाल्याने चर्चा तर होणारच.. दुसरीकडे, पाकिस्तान सुपर 8 फेरीत जागा मिळवेल की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. कारण नामिबियाविरुद्धच्या सामन्यावर सर्वकाही अवलंबून होतं. पण पाकिस्तानने नामिबियाचा धावांनी पराभव केला आणि सुपर 8 फेरीत जागा पक्की केली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमवून 199 धावा केल्या. तसेच विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही नामिबियाला गाठता आलं नाही आणि अमेरिकेचं सुपर 8 फेरीचं स्वप्न भंगलं.

भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका यांच्यानंतर पाकिस्तान हा आठवा संघ ठरला आहे. आता 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे. सुपर आठ फेरीत दोन गट पडले असून भारताच्या गटात वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे हे संघ आहेत. तर दुसऱ्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ आहे. या दोन्ही गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीत जागा मिळणार आहे. भारताचे सामने वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वेशी होणार आहे. दोन्ही गटात प्रत्येक संघ 3 सामने खेळणार आहे. तीन पैकी 2 विजय मिळवणारा आणि रनरेट चांगल्या असलेल्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल.

टी20 विश्वचषक 2026 सुपर 8 फेरीचे सामने
तारखा सामने वेळ ठिकाण
21फेब्रुवारी, शनिवार न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संध्याकाळी 7.00वाजता प्रेमादासा, कोलंबो
22 फेब्रुवारी, रविवार श्रीलंका विरुद्ध इंग्लंड दुपारी 3.00 वाजता कॅंडी
22 फेब्रुवारी, रविवार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संध्याकाळी 7.00वाजता अहमदाबाद
23फेब्रुवारी, सोमवार वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे संध्याकाळी 7.00वाजता मुंबई
24 फेब्रुवारी, मंगळवार इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संध्याकाळी 7.00वाजता कॅंडी
25फेब्रुवारी, बुधवार श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संध्याकाळी 7.00वाजता प्रेमादासा, कोलंबो
26 फेब्रुवारी, गुरुवार दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज दुपारी 3.00 वाजता अहमदाबाद
26फेब्रुवारी, गुरुवार भारत विरुद्ध झिम्बाब्वे संध्याकाळी 7.00वाजता चेन्नई
27 फेब्रुवारी, शुक्रवार इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संध्याकाळी 7.00वाजता प्रेमादासा, कोलंबो
28 फेब्रुवारी, शनिवार श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान संध्याकाळी 7.00वाजता कॅंडी
1 मार्च, रविवार दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे दुपारी 3.00 वाजता दिल्ली
1 मार्च, रविवार भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संध्याकाळी 7.00वाजता कोलकाता