टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेसाठी 12 संघांची निवड, उर्वरित 8 संघांना द्यावी लागणार परीक्षा

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीला अजूनही सुरुवात झालेली नाही. त्या आधीच पुढच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. 2028 स्पर्धेसाठी एकूण 12 संघ पात्र ठरले आहेत. तर उर्वरित 8 संघांना कठीण परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेसाठी 12 संघांची निवड, उर्वरित 8 संघांना द्यावी लागणार परीक्षा
टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेसाठी 12 संघांची निवड, उर्वरित 8 संघांना द्यावी लागणार परीक्षा
Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 20, 2026 | 5:16 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर आता सुपर 8 फेरीचे वेध लागले आहे. भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या संघांनी सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीत या 8 पैकी 4 संघांना संधी मिळणार आहे. सुपर 8 फेरीत एकूण 12 सामने होतील. यात गट 1 मध्ये सहा आणि गट 2 मध्ये सहा सामने होती. दोन्ही गटात टॉपला असलेल्या दोन संघांना पुढच्या फेरीचं तिकीट मिळेल. असं असताना आतापासून पुढच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरित्या होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 12 संघ पात्र ठरले आहेत. कसं काय ते समजून घ्या.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत जागा मिळवलेल्या संघांना या स्पर्धेत थेट एन्ट्री मिळाली आहे. यात भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांचा समावेश आहे. झिम्बाब्वे या स्पर्धेत पहिल्यांदा थेट सुपर 8 फेरी गाठली आहे. त्यामुळे त्यांना पात्रता फेरीत परीक्षा देण्याची गरज नाही. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतच ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद असल्याने ऑस्ट्रेलियाची थेट निवड झाली आहे. न्यूझीलंड देखील आगामी टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करणार आहे. त्यामुळे त्यांनाही थेट एन्ट्री मिळाली असून दोन संघ आधीच ठरले होते. पण न्यूझीलंडचा संघ यजमानही आणि सुपर 8 फेरीतही आहे. त्यामुळे एकूण 9 संघ येथेच झाले.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतरही अफगाणिस्तानचा संघ पात्र ठरला आहे. आयसीसी क्रमवारीवर ही निवड झाली आहे. तर बांगलादेशलाही टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेचं थेट तिकीट मिळालं आहे. आयसीसी क्रमावारीवर ही निवड करण्यात आली आहे. आयसीसी रँकिंगच्या आधारे पुढील टी-२० विश्वचषकासाठी आयर्लंडची निवड झाली आहे. आता 12 संघ ठरले असून उर्वरित 8 संघांसाठी चुरस असणार आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षात कोणते संघ पात्र ठरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us