AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup Semi Final 2 live streaming: सेमीफायनलची दुसरी लढत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना

T20 World Cup: विश्वचषकातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड संघाने इंग्लंडला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. आता पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेता संघ न्यूझीलंडशी भिडेल.

T20 World Cup Semi Final 2 live streaming: सेमीफायनलची दुसरी लढत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रलिया
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 1:56 AM
Share

दुबई:  यंदाचा टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आपल्याला अंतिम सामन्यात खेळणारी एक टीमही मिळाली. सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला मात देत न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली आहे. चुरशीच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला आहे. त्यानंतर आता अंतिम सामन्यात जाणारा दुसरा संघ कोणता? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पाकिस्तानच्या संघाची कामगिरी या स्पर्धेत सर्वात भारी आहे. सुपर 12 फेरीत  5 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह त्यांनी ही फेरी गाठली आहे. तर दुसरीकडे ग्रुप 1 मधून आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने नेही 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह सेमीफायनल गाठली आहे. आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे संघ आमने-सामने भिडणार आहेत. यातील जिंकणारा संघ 14 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळेल.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनलचा सामना कधी खेळवला जाईल?

टी – 20 विश्वचषकातील दुसरा सेमीफायनलचा सामना आज गुरुवारी (11 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल. नाणेफेक 7 वाजता होणार आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आजचा टी -20 सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे होईल?

या विश्वचषकातील दुसरा सेमीफायनल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केला जाईल.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग कोठे होईल?

या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता

आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ

पाकिस्तान संघ: मोहम्मद रिजवान, बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, हैदर अली, शाहीन आफ्रीदी

ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, आरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वॅड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्च, अॅडम झाम्पा, जोश हॅजलवुड.

इतर बातम्या

England vs New Zealand T20 world cup Result: चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडची इंग्लंडवर सरशी, 5 विकेट्सने मात देत मिळवली अंतिम सामन्यात जागा

विराट कोहलीच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या देणारा ताब्यात, मुंबई पोलिसांची हैद्राबादमध्ये कारवाई, आरोपी आहे IIT पासआऊट

T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

(T20 world cup Semi final 2 between Pakistan vs Australia live streaming when and where to watch online match)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...