AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs SL : श्रीलंकेची पाकिस्तान विरुद्ध बॉलिंग, बाबर आझमची हकालपट्टी, एकूण 5 बदल

Pakistan vs Sri Lanka Super 8 Toss : पाकिस्तानची श्रीलंकेविरुद्धच्या सुपर 8 मधील शेवटच्या सामन्यात पराभवाने सुरुवात झालीय. पाकिस्तानच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला. श्रीलंकेने पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. पाकिस्तानने या सामन्यातून अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम याला वगळलं आहे.

PAK vs SL : श्रीलंकेची पाकिस्तान विरुद्ध बॉलिंग, बाबर आझमची हकालपट्टी, एकूण 5 बदल
Babar Azam PakistanImage Credit source: PTI
| Updated on: Feb 28, 2026 | 7:27 PM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत आज 28 फेब्रुवारीला आशियातील 2 यशस्वी संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील तिसरा आणि शेवटचा सामना आहे. यजमान श्रीलंकेचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे श्रीलंकेचा हा सामना जिंकून मोहिमेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर शुक्रवारी इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केल्याने पाकिस्तानच्या सेमी फायनलच्या आशा कायम आहेत. मात्र पाकिस्तानला हा सामना फार मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याचं आयोजन हे पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार दासून शनाका याने फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पाकिस्तान किती स्फोटक बॅटिंग करते याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

सामन्यात एकूण 5 बदल

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या सामन्यासाठी दोन्ही संघांकडून एकूण 5 बदल करण्यात आले आहेत. पाकिस्तानने या करो या मरो सामन्यासाठी 3 बदल केले आहेत. अनुभवी फलंदाज बाबर आझम याला डच्चू दिला आहे. तसेच सॅम अय्युब आणि सलमान मिर्झा या दोघांनाही बसवलं आहे. तर नसीम शाह, ख्वाजा नाफे आणि अब्ररार अहमद या तिघांना संधी दिली आहे. तसेच श्रीलंकेने 2 बदल केले आहेत.

कुसल मेंडीस याला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे. मेंडीसच्या जागी कामिल मिशारा विकेटकीपरची जबाबदारी पार पाडणार आहे. तर दुशन हेमंथा याच्या जागी जनिथ लियानागे याला संधी देण्यात आली आहे.

पाकिस्तानला किती फरकाने विजय मिळवावा लागणार?

दरम्यान न्यूझीलंडच्या खात्यात 3 गुण आहेत. तर पाकिस्तानने हा सामना जिंकल्यास त्यांचेही 3 गुण होतील. मात्र पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर त्यांना न्यूझीलंडपेक्षा भारी रनरेटने विजय मिळवावा लागणार आहे. श्रीलंकेने पाकिस्तानला बॅटिंगसाठी बोलावलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही स्थितीत 64 धावांनी विजय मिळवावा लागणार आहे.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : पथुम निसांका, कामिल मिशारा(विकेटकीपर), चरित असलंका, पवन रथनायके, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका(कर्णधार), जेनिथ लियानागे, दुनिथ वेल्लालागे, महीश तीक्षाना, दुष्मंथा चमीरा आणि दिलशान मधुशंका.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), ख्वाजा नाफे, उस्मान खान (विकेटकीपर), शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद आणि उस्मान तारिक.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...