USA vs IRE: पावसामुळे पाकिस्तानला मोठा झटका, या 2 संघांनाही फटका, आव्हान संपुष्टात

United Stats vs Ireland Rain: यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तान आणि इतर 2 संघांना मोठा फटका बसला आहे.

USA vs IRE: पावसामुळे पाकिस्तानला मोठा झटका, या 2 संघांनाही फटका, आव्हान संपुष्टात
babar azam pakistan
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 11:54 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 30 वा सामना हा पावसामुळे रद्द झाला आहे. या सामन्यात यजमान यूनायटेड स्टेट्स विरुद्ध आयर्लंड हे संघ आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे करण्यात आलं होतं. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार होती. मात्र पाऊस इतका जोरदार होता की टॉसही होऊ शकला नाही. पंचांनी सामना होण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. पंचांनी 2-3 वेळा मैदानाची पाहणी केली. मात्र खेळपट्टी खेळण्यालायक नव्हती. त्यामुळे अखेर रात्री 11 नंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. यूएसएने याआधी 2 सामने जिंकले होते. यूएसएचे अशाप्रकारे एकूण 5 गुण झाले. यूएसए अशाप्रकारे ए ग्रुपमधून टीम इंडियानंतर सुपर 8 मध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरली. तसेच सामना रद्द झाल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसला. सामना रद्द होताच पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्ठात आलं. मात्र पावसाने पाकिस्तानसह एकूण 3 संघांचं पॅकअप केलं.

पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड या तिन्ही संघांनी प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत. यूएसए विरुद्ध आयर्लंड सामन्यात पाहुण्या संघाने विजय मिळवला असता, तर पाकिस्तानसाठी ते सुपर 8 च्या हिशोबाने फायदेशीर ठरलं असतं. मात्र तसं होऊ शकलं नाही. सामना रद्द होणंही पाकिस्तानसाठी तोट्याचं ठरलं. तसेच पावसामुळे पाकिस्तानसह, आयर्लंड आणि कॅनडाही स्पर्धेतून बाहेर झाली.

दरम्यान आता 15 जून रोजी कॅनडा आपला साखळी फेरीतील चौथा आणि अखेरचा सामना हा टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे. तर 16 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड असा सामना होणार आहे. मात्र हा सामना दोन्ही संघांसाठी औपचारिकता असणार आहे, कारण दोघांचंही आव्हान संपुष्टात आलं आहे.

पावसाने काढली पाकिस्तानची विकेट

आयर्लंड टीम: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, क्रेग यंग, ​​बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम आणि रॉस एडेअर.

युनायटेड स्टेट्स टीम: आरोन जोन्स (कॅप्टन), शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल आणि मिलिंद कुमार.

Non Stop LIVE Update
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं.
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं..
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली.
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्..
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्...
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक.
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा...
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा....
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.