AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, या 17 खेळाडूंना मिळाली संधी

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन झालं असून 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळली जाणार आहे. पण यापूर्वी श्रीलंकेत दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून 17 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा,  या 17 खेळाडूंना मिळाली संधी
Image Credit source: (फोटो-X/DCCIOFFICIAL)
| Updated on: Jan 06, 2025 | 5:19 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियात बरीत उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म नसल्याने सध्या चिंतेचा विषय आहे. असं असलं तरी रोहित शर्माच्या खांद्यावर धुरा असणार यात काही शंका नाही. वनडे फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होणार असून भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून 12 जानेवारीला संघाची घोषणा केली जाणार आहे. दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2019 नंतर पहिल्यांदा खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे पहिलाच सामना 12 जानेवारी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वी श्रीलंकेत दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळली जाणार आहे. 12 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या दिव्यांग संघाची घोषणा झाली असून यात 17 खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेचे राष्ट्रीय निवड पॅनलने मुख्य प्रशिक्षक रोहित जलाने याच्या नेतृ्त्वात जयपूरमध्ये प्रशिक्षण शिबीर घेतलं होतं. प्रशिक्षणानंतर खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा विक्रांत केनीच्या खांद्यावर आहे. तसेच उपकर्णधार म्हणून रविंद्र सँटेकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघाची घोषणा झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रोहित जलानी यांनी सांगितलं की, ‘ही एक संतुलित टीम आहे. तसेच प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यास सक्षम आहे.’ भारत पाकिस्तान यांच्यात पहिला सामना 12 जानेवारीला होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 13 जानेवारीला इंग्लंडविरुद्ध, 15 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध, 16 जानेवारीला पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध, 18 जानेवारीला इंग्लंड आणि 19 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. अंतिम फेरीचा सामना 21 जानेवारीला होणार आहे.

दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचे खेळाडू

विक्रांत रवींद्र केनी (कर्णधार), रवींद्र गोपीनाथ सांते (उपकर्णधार), योगेंद्र सिंग (यष्टीरक्षक), अखिल रेड्डी, राधिका प्रसाद, देपेंद्र सिंग (यष्टीरक्षक), आकाश अनिल पाटील, सनी गोयत, पवन कुमार, जितेंद्र, नरेंद्र, राजेश, रवींद्र सिंग (यष्टीरक्षक). निखिल मनहास, आमिर हसन, माजिद मगरे, कुणाल दत्तात्रेय फणसे आणि सुरेंद्र.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?