Hardik Pandya-Natasa Stankovic प्रकरणावर मित्राचा मोठा खुलासा! घटस्फोटाच्या चर्चेवरुन काय म्हणाला?

natasa stenkovic Hardik Pandya divorce rumors: नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पंड्या विभक्त झाले आहेत की नाही? हे नेटकऱ्यांना जाणून घ्यायचं आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांबाबत जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

Hardik Pandya-Natasa Stankovic प्रकरणावर मित्राचा मोठा खुलासा! घटस्फोटाच्या चर्चेवरुन काय म्हणाला?
hardik and natasa
| Updated on: May 28, 2024 | 8:39 PM

टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दि पंड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा स्टेनकोविक या दोघांच्या वैवाहिक आयुष्याची सोशल मीडियावर सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. हार्दिक-नताशा या दोघांमध्ये बिनसलं असून लवकरच ही जोडी घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या प्रकरणाबाबत दररोज नवनवीन पाहायला मिळत आहे. घटस्फोटांच्या चर्चांबाबत हार्दिक आणि नताशा या दोघांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. अशा आता हार्दिक-नताशा या दोघांच्या मित्राने या प्रकरणाबाबत खुलासा केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मित्राचं म्हणणं असं आहे की हार्दिक पंडया आणि नताशा स्टेनकोविक गेल्या अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. नताशा हार्दिकला सोडून गेली आहे. आता ती केव्हा परत येणार सांगता येणार नाही. मात्र दोघांमध्ये फिस्कटलं आहे, असं मित्राने दिलेल्या माहितीनुसार मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. किंवा हार्दिक-नताशा या दोघांकडून याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही.

नताशा स्टेनकोविक हीने इंस्टाग्रामवरुन पंड्या हे आडनाव हटवल्याचा दावा केला जात आहे. नताशाला या सर्व दरम्यान हार्दिक पंड्याबाबत विचारण्यात आलं. नताशाने यावर धन्यवाद म्हणून विषय संपवला. नताशाच्या या प्रतिक्रियेमुळे आता अनेक चर्चा रंगल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला हार्दिक परदेशात सुट्टीचा आनंद घेत आहे. हार्दिकने नुकताच एक व्हीडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला. हार्दिक या व्हीडिओमध्ये पोहताना दिसत आहे. हार्दिकसह त्याचा मुलगा अगस्तयही नाही. त्यामुळेही चर्चांना वाव मिळाला आहे.

दरम्यान भावाच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा रंगली असताना कृणाल पंड्याने इंस्टा स्टोरी पोस्ट केली होती. कृणालने या स्टोरीत त्याचा पुतण्या अगस्त्य आणि मुलगा कविर या दोघांना अंगावर उचल्याचं दिसत आहेत. या स्टोरीवर नताशाने हार्ट इमोजी कमेंट केली होती. नताशाच्या या कमेंटचीही सोशल मीडियावर रंगली आहे.

दरम्यान नताशा ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नताशाने बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. हार्दिक-नताशा दोघांनी 2023ला दुसऱ्यांदा उदयपूर येथे लग्न केलं. सध्या या दोघांच्या वैवाहिक आयु्ष्यात वादळ उठल्याचं चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.