
T-20 वर्ल्ड कपमधील टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील मॅच सुरू व्हायला काही तास बाकी आहेत. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या मॅचकडे असताना क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूने आपलं जीवन संपवलं आहे. आपल्या राहत्या घराच्या बाल्कनीमधून त्यांनी उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली. या खेळाडूच्या मृत्यूनंतर दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी शोक व्यक्त केला आहे.
डेव्हिड जॉन्सन असं या माजी खेळाडूचं नाव असून चौथ्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. डेव्हिड जॉन्सन यांना तीन दिवसांपूर्वीच दवाखान्यामधून डिस्चार्ज देण्यात आला होता. जॉन्सन हे डिप्रेशनचे शिकार ठरल्याची माहिती समजत आहे. जॉन्सन हे वेगवान गोलंदाज होते, टीम इंडिया आणि कर्नाटक संघासाठी त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळलं आहे.
डेव्हिड जॉन्सन यांनी टीम इंडियाकडून 1996 साली पदार्पण केलं होतं. टीम इंडियाकडून त्यांनी दोन सामने खेळले होते, यामध्ये त्यांनी एकूण तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाकडून त्यांना फारशी संधी मिळाली नाही. मात्र कर्नाटक संघाकडून त्यांनी दीर्घकाळ रणजी क्रिकेट खेळले आहे. 39 प्रथम श्रेणी आणि 33 लिस्ट ए सामने खेळले आहेत. 1992 मध्ये त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. दहा वर्षे त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलीत. 2002 पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते सक्रीय होते.
Saddened to hear the passing of my cricketing colleague David Johnson. Heartfelt condolences to his family. Gone too soon “ Benny”!
— Anil Kumble (@anilkumble1074) June 20, 2024
डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाची बातमी येताच सोशल मीडियावर आजी-माजी खेळाडू त्यांनी श्रद्धांजली देत आहेत. टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे यानेही जॉन्सनला श्रद्धांजली वाहिली. माझा क्रिकेट पार्टनर डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती हार्दिक संवेदना, अशा पोस्ट अनिल कुंबळेने केली आहे.