
मुंबई | क्रिकेट टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाचं सलग आणि एकूण दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. आता टीम इंडिया विश्रांतीवर आहे. टीम इंडिया काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया विंडिज विरुद्धच्या या टेस्ट सीरिजमधून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 मोहिमेला सुरुवात करणार आहे. या दरम्यान टीम इंडियाचा विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून त्याच्या इंस्टा स्टोरीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
विराटची अशीच एक आणखी इंस्टा स्टोरी व्हायरल झाली आहे. विराट सातत्याने अशा स्टोरी का शेअर करतोय, असा प्रश्न हा क्रिकेट चाहत्यांना पडलाय. विराटने आज 21 जून रोजी इंस्टा स्टोरी शेअर केलीय. विराटने मंगळवारी 20 जून रोजी एकूण 2 इंस्टा स्टोरी शेअर केल्या होत्या. या दोन्ही स्टोरी भिन्न होत्या. या दोन्ही स्टोरीजचा एकमेकांशी संबंध नव्हता. विराटची एक पोस्टही टेस्ट डेब्यूबाबत होती. तर दुसरी स्टोरी ही रहस्यमयी होती.
विराटची इंस्टा स्टोरी
विराटने आयपीएलच्या 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी शानदार कामगिरी केली. विराटकडून त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनमध्ये जोरदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र विराट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महाअंतिम सामन्यातील पहिल्या आण दुसऱ्या डावात अनुक्रमे 14 आणि 49 धावांची खेळी केली.
कसोटी मालिका
पहिला सामना – 12 ते 16 जुलै
दुसरा सामना – 20-24 जुलै
वनडे सीरिज
पहिला सामना – 27 जुलै
दुसरा सामना 29 जुलै
तिसरा सामना 1 ऑगस्ट
टी 20 सीरिज
पहिला सामना – 4 ऑगस्ट
दुसरा सामना – 6 ऑगस्ट
तिसरा सामना – 8 ऑगस्ट
चौथ्या सामना – 12 ऑगस्ट
पाचवा सामना – 13 ऑगस्ट.
टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सुरुवात ही 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही टेस्ट सीरिज असणार आहे. त्यानंतर 3 मॅचची वनडे सीरिज पार पडेल. तर अखेरीस 5 मॅचची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या विंडिज दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे.