AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅच गाजवली, 6 विकेट्स घेतल्या… पण आता 2 वर्ष क्रिकेट खेळता येणार नाही; बीसीसीआयने असं पकडलं खोटं!

भारताचा अंडर 19 संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात फिरकीपटू रोहित यादवने आपली छाप सोडली होती. पण आता बीसीसीआयने त्याचं खोटं पकडलं असून 2 वर्षांची बंदी घातली आहे. नेमकं काय केलं ते जाणून घेऊयात...

मॅच गाजवली, 6 विकेट्स घेतल्या... पण आता 2 वर्ष क्रिकेट खेळता येणार नाही; बीसीसीआयने असं पकडलं खोटं!
मॅच गाजवली, 6 विकेट्स घेतल्या... पण आता 2 वर्ष क्रिकेट खेळता येणार नाही; बीसीसीआयने असं पकडलं खोटं!Image Credit source: pti/instagram
| Updated on: Sep 03, 2026 | 8:57 PM
Share

भारताचा अंडर 19 संघ श्रीलंका दौऱ्यावर ऑगस्ट 2026 मध्ये गेला होता. या संघात फिरकीपटू रोहित यादवही होता आणि कोलंबोत युथ टेस्ट खेळला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 4 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या याच कामगिरीमुळे भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध 211 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात रोहित यादवच्या कामगिरीचं कौतुक झालं होतं. कारण दोन्ही डावात त्याने महत्त्वाच्या 6 विकेट काढल्या होत्या. पण आता त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली गेली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी बीसीसीआयने ही कारवाई केली आहे. रिपोर्टनुसार, आपलं वय कमी करण्यासाठी त्याने बनावट आधारकार्ड तयार केलं होतं. यात त्याने वय आणि जन्मस्थान अनेकदा बदलल्याचं समोर आलं आहे. बीसीसीआयने या प्रकरणी तपास केला आणि त्यात दोषी आढळला.

रोहित यादवला कसं पकडलं?

मागच्या वर्षी त्याच्या जन्मतारखेत बरेच बदल केल्याचं दिसून आलं. रोहित यादवने 2014 मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं. तेव्हा त्याने जन्म तारीख 7 जुलै 2007 नोंदवली होती. तसेच उत्तर प्रदेशचा पत्ता नोंदवला होता. 2017 मध्ये त्याने आधार कार्ड अपडेट केलं आणि जन्म वर्ष बदलून 2006 केलं. 2020 मध्ये आणखी काही अपडेट केले, पण जन्म वर्षे 2006चं होतं. 2021 मध्ये त्याने जन्म वर्ष पुन्हा बदललं आणि 2009 केलं. यावेळी त्याने पत्ता बदलला आणि उत्तर प्रदेश ऐवजी पश्चिम बंगालमधील हावडा केला. त्यानंतर रेकॉर्डमध्ये लिलुआह नोंद केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पत्ता कट

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड केली होती. पण तपासात त्याचा बनाव उघड झाल्याने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली गेली आहे. अंडर 19 वयोगटात खेळण्यासाठी त्याने ही फसवणूक केली होती. या कारवाईनंतर ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघात रोहित यादवच्या जागी दुसरा खेळाडू निवडला जाणार आहे. यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंवर वयाचा बनाव केल्याप्ररकणी कारवाई केली. यात भारताला अंडर 19 वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या मनजोत कालरा याचंही नाव आहे. यासह प्रिन्स यादव, नितीश राणा याच्यावरही कारवाई झाली आहे.

Follow Us
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा...
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा विसर्ग