AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs PAK लॉर्ड्स कसोटीत हायव्होल्टेज ड्रामा; इम्रान खान यांच्या मुलांच्या मुलाखतीवरून वादाला फोडणी, शेवटी झालं असं…

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. मात्र या सामन्यादरम्यान इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत दाखवल्याने वादाला फोडणी मिळाली आहे. पाकिस्तान संघाने सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. पण हे प्रकरण शमलं. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

ENG vs PAK लॉर्ड्स कसोटीत हायव्होल्टेज ड्रामा; इम्रान खान यांच्या मुलांच्या मुलाखतीवरून वादाला फोडणी, शेवटी झालं असं...
ENG vs PAK लॉर्ड्स कसोटीत हायव्होल्टेज ड्रामा; इम्रान खान यांच्या मुलांच्या मुलाखतीवरून वादाला फोडणी, शेवटी झालं असं...Image Credit source: Icc X account/Twitter
| Updated on: Aug 28, 2026 | 3:11 PM
Share

इंग्लंड पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 9 गडी गमवून 248 धावा केल्या आहे. असं असताना या सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. सामन्याच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेक सुरू होण्यापूर्वी या सामन्यात मुलाखतीचं प्रकरण समोर आलं. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लागलीच आक्षेप घेत स्काय स्पोर्ट्सशी संपर्क साधला आणि सामन्यावर बहिष्काराची धमकी देऊन टाकली होती. त्यामुळे मैदानात काही काळ तणावाचं वातावरण होतं. स्काय स्पोर्ट्सने इंग्लंडचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांचे पुत्र कासिम आणि सुलेमान खान यांची घेतलेली मुलाखत प्रसारित केली. या मुलाखतीत इम्रान खान यांच्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत आणि अंधुक होणाऱ्या दृष्टीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर कसोटी सामन्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या आक्षेपानंतरही चॅनेलने 18 मिनिटांची मुलाखत प्रसारित केली. ही मुलाखत इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल आथर्टन यांनी घेतली. यावेळी त्यांनी इम्रान खान यांच्या मुलांना बोलतं केलं. सुलेमान आणि कासिम खान यांनी या मुलाखतीत इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच वडिलांच्या जीवाला धोका असून तुरुंगात योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप केला. ही मुलाखत क्रिकेट सामन्याच्या थेट प्रक्षेपणात राजकीय मुद्द्यांना हात घालणारी होती असा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला. त्यामुळे लंच ब्रेकनंतर पाकिस्तान खेळाडू मैदानात उतरणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला.

पाकिस्तान संघाच्या बहिष्काराच्या पावित्र्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मध्यस्थी केली. त्यानंतर हे प्रकरण कसंबसं निवळलं आणि खेळाडू मैदानात परतले. दरम्यान, ही मुलाखत सुरू असताना पाकिस्तानातील सरकारी चॅनलने आपल्या देशात प्रक्षेपण पूर्णपणे ब्लॅकआऊट केलं होतं.

इम्रान खान 73 वर्षांचे असून ऑगस्ट 2023 पासून भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरूंगात आहे. त्याने या प्रकरणी 14 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण राजकीय सूडापोटी कारवाई केल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान रावळपिंडी येथील तुरूंगात असून तीन वर्षांहून अधिक काळ तुरूंगवास भोगला आहे.

Follow Us
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी;
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी; स्वामींना बांधणार राखी
ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
MNS On Marathi Sakti | ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरे...
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरेंच्या बहिणीसोबतचे खास फोटो समोर
दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
Disha Salian Case Update | दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य