T20 World Cup मधल्या सिक्सर किंग्सची यादी, टॉप 5 मध्ये भारताचा एकमेव खेळाडू

| Updated on: Oct 14, 2021 | 5:42 PM

टी20 क्रिकेट म्हटलं की त्यात षटकारांचा पाऊस पडतोच. त्यात टी20 वर्ल़्डकपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू म्हटलं की काही खेळाडूंची नाव आवर्जून समोर येतात.

1 / 6
17 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होत आहे. टी20 क्रिकेटमधलं की त्यात षटकारांचा पाऊस पडणार हे नक्कीच! यंदाही असाच पाऊस पडणार असला तरी आता पर्यंत टी20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकलेल्या खेळाडूंच्या यादीवर एक नजर मारुया...

2 / 6
टी20 मध्ये तूफानी फलंदाज म्हटलं तर सर्वात पहिलं नाव वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचच (Chris Gayle) येत. त्याने प्रत्यक प्रकारत्या टी20 सामन्यात स्वत:चा जलवा दाखवला आहे. आतापर्यंत टी20 विश्वचषकाच्या 28 सामन्यात त्याने तब्बल 60 षटकार खेचले असून तो अव्वल स्थानावर आहे.

3 / 6
गेलनंतर नाव येतं भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग (Yuvraj Singh) याचं. 2007 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार खेचणाऱ्या युवीने आतापर्यंत 31 टी 20 विश्वचषकाच्या सामन्यात 33 षटकार लगावले आहेत. 2016 मध्ये शेवटचा विश्वचषक खेळलेला युवी आता मात्र निवृत्त झाला आहे.

4 / 6
तिसऱ्या नंबरवर  ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन (shane watson) येतो. ऑस्ट्रेलियाने एकदाही टी20 विश्वचषक जिंकला नसला तरी शेनने मात्र धमाकेदार फलंदाजी अनेकदा दाखवली आहे. त्याने 24 टी20 विश्व कपच्या सामन्यात 31 षटकार खेचले आहेत.

5 / 6
चौथ्या नंबरवर येतो दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्स (ab de villiers). एबीने 30 टी20 विश्व चषकाच्या सामन्यात 30 षटकार उडवले आहेत.

6 / 6
पाचव्या नंबरवर लागतो माजी दिग्गज श्रीलंकन क्रिकेटर महेला जयवर्धने (mahela jayawardene ). शांत स्वभावाच्या महेलाने 31 टी20 विश्वचषकाच्या सामन्यात 25 षटकार खेचले आहेत.