AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्लेइंग 11 मधून आतबाहेर असण्यावरून अर्शदीप सिंगने दिली प्रतिक्रिया, संघ व्यवस्थापनाची फिरकी घेत म्हणाला..

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात अभिषेक शर्माने जबरदस्त कामगिरी केली. तर अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात कमाल केली. या सामन्यानंतर अर्शदीपने मन मोकळं केलं.

प्लेइंग 11 मधून आतबाहेर असण्यावरून अर्शदीप सिंगने दिली प्रतिक्रिया, संघ व्यवस्थापनाची फिरकी घेत म्हणाला..
प्लेइंग 11 मधून आतबाहेर असण्यावरून अर्शदीप सिंगने दिली प्रतिक्रियाImage Credit source: PTI
| Updated on: Jan 22, 2026 | 7:29 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडला 48 धावांनी पराभूत केलं. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि न्यूझीलंडवर दबाव वाढवला. त्याने 4 षटकं टाकली आणि 31 धावा दिल्या. असं असलं तरी न्यूझीलंडची फटकेबाजी पाहता अर्शदीपची गोलंदाजी प्रभावी ठरली. पण अर्शदीप सिंगची प्लेइंग 11 मधील जागा काही पक्की नाही. टीम कॉम्बिनेशन आणि बॅटिंग ऑर्डरचं गणित जुळवताना अनेकदा अर्शदीपला प्लेइंग 11 मधून डावललं जातं. त्यामुळे कधी प्लेइंग 11 मध्ये, तर कधी प्लेइंग 11 च्या बाहेर असतो. यावर अर्शदीप सिंगने मन मोकळं केलं. पत्रकार परिषदेत त्याला याबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर संघ व्यवस्थापनाची फिरकी घेत प्रतिक्रिया दिली.

अर्शदीप सिंगने पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘ज्या पद्धतीने मी टीमच्या आत बाहेर असतो, तसाच माझा चेंडू आत बाहेर होत असतो. यासाठी मला खूप मज्जा येते.’ अर्शदीप सिंगने प्लेइंग 11 मधून आतबाहेर असूनही आत्मविश्वास कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. प्लेइंग 11 मध्ये नसलो तरीक्षमतेवर काही फरक पडत नाही, हे सिद्ध केलं आहे. अर्शदीप सिंगने 73 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 111 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीप सिंगने सांगितलं की त्याचं काम फक्त तयार राहणं आहे. ‘संघ जेव्हा नव्या किंवा जुन्या चेंडूने गोलंदाजी करण्याची जबाबदारी दिली जाईल. तेव्हा मी सर्वश्रेष्ठ देईन. माझा लक्ष्य फक्त ज्या गोष्टी नियंत्रणात आहे त्याकडे असेल.’

अर्शदीप सिंगने न्यूझीलंडविरुद्ध एक विकेट घेतली. पण त्याने शाहीन शाह आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला. अर्शदीप सिंग भारतासाठी पहिलं किंवा दुसरं षटक टाकतो. या दोन षटकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 विकेट घेतल्या आहेत. तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि युएईचा गोलंदाज जुनैद सिद्दकी 27 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहेत. अर्शदीप सिंग 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करू शकलेला नाही. भारताने 2025 या वर्षात एकूण 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. पण यापैकी फक्त 13 सामन्यात अर्शदीप सिंग प्लेइंग 11 चा भाग होता. या फॉर्मेटमध्ये प्रभावशाली गोलंदाजी करूनही आशिया कप स्पर्धेतील बहुतांश सामन्यातून डावलण्यात आलं.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग