देशातील असे रेल्वे स्थानक, जेथून एकही ट्रेन सुटत नाही, जाणून घ्या नाव
देशात अनेक रेल्वे स्थानकं आहेत. जेथून देशभरात रेल्वे गाड्या सोडल्या जात असतात. परंतू एक रेल्वे स्थानक असेही आहे ज्या स्थानकावरुन एकही ट्रेन सुटत नाही....

भारतात आजही ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दररोज भारतात दीड कोटीहून अधिक लोक ट्रेनने प्रवास करतात. यासाठी लोक त्यांच्या घराजवळील रेल्वे स्थानकातून ट्रेनची तिकीटे बुक करतात.त्यानंतर प्रवास देखील करतात. परंतू एखादे असे रेल्वे स्थानक तुम्ही पाहिले आहे का जेथून एकही ट्रेन सुटत नाही. वास्तविक आपल्या देशात एक असे रेल्वे स्थानक आहे जेथून एकही पॅसेजर ट्रेन थांबत नाही.जर ट्रेन सुटतच नाही तर तुम्हाला या स्थानकातून तुम्हाला कुठेच जाता येणे शक्य नाही. मग हे स्थानक का बांधले असा सवाल तुमच्या मनात आला असेल…चला तर या स्थानकाचे नाव काय आहे हे पाहूयात…..
कुठे आहे हे अनोखे स्थानक ?
तुम्हाला एकही ट्रेन जेथून पकडता येणार नाही असे रेल्वे स्थानक आपल्या देशाच्या पश्चिम बंगालमध्ये आहे. बंगालच्या मालदा जिल्ह्यातील भारत आणि बांग्लादेशाच्या सीमेवर हे स्थानक आहे. या स्थानकाचे नाव ‘सिंहाबाद’ रेल्वे स्थानक आहे. येथे कोणतीही पॅसेंजर ट्रेन थांबत नाही. त्यामुळे येथून तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही. कारण पॅसेंजर ट्रेनला येथे थांबा नाही.
मग हे स्थानक काय कामाचे ?
आता तुम्ही विचार करत असाल की या स्थानकावर जर कोणतीही पॅसेंजर ट्रेन थांबतच नाही मग या स्थानकाचा उपयोग काय होतो. ब्रिटीश काळात हे स्थानक बांधले होते. त्यावेळी मालगाडीसाठी हे स्थानक वापरले जात होतो. त्यामुळेच येथे कोणतीही पॅसेंजर ट्रेन थांबत नाही. या स्थानकास भारताचे शेवटचे स्थानक म्हटले जाते. कारण हे बांगलादेशाच्या सीमेवर आहे.
