आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला ‘हे’ धुरंदर खेळाडू मुकणार, प्रत्येकाची कारणं वेगळी

| Updated on: Aug 23, 2021 | 10:23 AM

कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात मधूनच स्थगित झालेली उर्वरीत आयपीएल स्पर्धा युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पण उर्वरीत आयपीएलमध्ये काही दिग्गज खेळणार नसून प्रत्येकाची आपआपली कारणं आहेत.

1 / 6
इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे पर्व मे महिन्यात कोरोनाच्या संकटामुळे थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आता उर्वरीत सामन्यांचे दुसरे पर्व युएईत पार पडत आहे. 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत काही दिग्गज खेळाडू मैदानावर उतरणार नसून त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

2 / 6
आयपीएलच्या उर्वरीत पर्वात खेळणार नसलेल्या खेळाडूंमध्ये नुकतच समाविष्ट झालेलं नाव म्हणजे इंग्लंडचा य़ष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Joss buttler). शनिवारी समोर आलेल्या बातमीनुसार बटलर त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी  19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या (IPL 14) उर्वरीत सामन्यांना मुकणार असल्यांचं त्याने सांगितलं.

3 / 6
राजस्थान संघाचा आणखी एक खेळाडू आणि प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चरही स्पर्धेला मुकणार आहे. दुखापतीमुळे मागील काही महिन्यांपासून मैदानाबाहेर असणारा जोप्रा भारताविरुद्धच्या कसोटीतही दिसत नाही.

4 / 6
दिल्ली कॅपिटल्स संघातून आरसीबी मध्ये आलेला डॅनियल सॅम्सही उर्वरीत आयपीएलमध्ये खेळणार नाही. त्याच्या जागी आरसीबीने श्रीलंकेच्या दुशमंथा चामीरा याला घेतले आहे.

5 / 6
कोलकाता नाईट रायडर्सचा सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्सही उर्वरीत आयपीएल खेळणार नाही. त्याने काही महिन्यांपूर्वीच खाजगी कारणांमुळे युएईत पार पडणारे सामने खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

6 / 6
पंजाब किंग्स संघाचे दोन परदेशी खेळाडू स्पर्धेतून माघार घेत आहेत. रिले मेरेडिथ आणि झाए रिचर्डसन अशी या दोघांची नावे आहेत. दोघांनी दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे. यांच्यासह न्यूझीलंडचा फिन एलन आणि स्कॉट कुगलेजिन हेही खाजगी कारणामुळे स्पर्धेत दिसणार नाहीत.