IND vs AUS : नाशिककर फलंदाजांची शतकी खेळी, भारताचा सलग दुसरा विजय, ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने धुव्वा

India vs Australia 2nd Odi Match Result: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या सामन्यात 9 विकट्सने शानदार विजय मिळवला. भारताने या सलग दुसऱ्या विजयासह 2-0 अशा फरकाने मालिका जिंकली आहे.

IND vs AUS : नाशिककर फलंदाजांची शतकी खेळी, भारताचा सलग दुसरा विजय, ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने धुव्वा
ind vs aus
| Updated on: Sep 23, 2024 | 10:27 PM

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. अंडर 19 टीम इंडियाने यूथ वनडे सीरिजमधीयल दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अंडर 19 टीमवर सहज विजय मिळवला आहे. भारताने या विजयासह 2-0 अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली आहे. ऑस्ट्रेलियाचा डाव हा 176 धावांवर आटोपल्याने भारताला विजयासाठी 177 धावांचं आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान 22 षटकांमध्ये पूर्ण केलं. त्याआधी टीम इंडियाने सलामीचा सामना हा 9 विकेट्सने विजय मिळवला होतो.

नाशिककर साहिलची शतकी खेळी

भारताकडून नाशिककर साहिल पारख याने झंझावाती शतक ठोकलं. साहिलने 75 बॉलमध्ये 14 फोर आणि 5 सिक्ससह 109 धावांची विस्फोटक खेळी केली. साहिलच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 177 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. साहिलने 71 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्यानंतर रुद्र पटेल 10 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर साहिल आणि अभिज्ञान कुंडु या जोडीने दुसर्‍या विकेटसाठी 153 धावांची नाबाद भागीदारी केली. अभिज्ञान याने 50 चेंडूंमध्ये 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या.

त्याआधी ऑस्ट्रेलियाची आश्वासक सुरुवात झाली. मात्र भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत कांगारुंना गुडघे टेकायला भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 7 फलंदाजांनी प्रत्येकी दुहेरी आकडा गाठला. मात्र त्यापैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. या 7 पैकी एकालाही 40 पार मजल मारता आली नाही. वेगवान गोलंदाज सर्मथ नागराज, लेग स्पिनर मोहम्मद इनान आणि ऑफ स्पिनर किरण चोरमाले या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव हा 49.3 ओव्हरमध्ये 176 धावांवर आटोपला.

भारताचा सलग दुसरा विजय

अंडर 19 टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अमान (कॅप्टन), रुद्र मयूर पटेल, साहिल पारख, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), किरण चोरमले, कार्तिकेय के पी, हार्दिक राज, निखिल, मोहम्मद इनान, युधाजित गुहा आणि समर्थ एन.

अंडर 19 ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : ऑली पीक (कॅप्टन), रिले किंगसेल, ॲलेक्स ली यंग (विकेटकीपर), झॅक कर्टन, एडिसन शेरीफ, ख्रिश्चन हॉवे, लिंकन हॉब्स, हेडन शिलर, विश्व रामकुमार, हॅरी होकस्ट्रा आणि लचन रानाल्डो.