रिव्ह्यूने बदलला पंचांचा निर्णय अन् शतकवीर ग्रीव्ह्जचा डाव संपला; कुलदीपचा भन्नाट जल्लोष पाहून गिललाही हसू आवरेना!
Justin Greaves Wicket News: नॉटआऊटच्या निर्णयावर ग्रीव्ह्ज खूश झाला होता. पण रिव्ह्यूमध्ये धक्का बसल्याचे दिसून आले. विकेटनंतर कुलदीपच्या सेलिब्रेशनने गिलचंही हसू फुटले आहे.

तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जस्टिन ग्रीव्हजच्या (१०१ धावा) शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने सात गडी गमावून २९५ धावा केल्या. ग्रीव्हजने आपल्या १०८ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार मारले. जॉन कॅम्पबेलने ६२ धावा केल्या. आमिर जांगूने नाबाद ५८ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने ४० धावांत चार बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णाने दोन बळी आणि नितीश कुमार रेड्डीने एक बळी घेतला. यावेळी जस्टिन ग्रीव्हजच्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर आता कुलदीप यादवच्या जल्लोषाची चर्चा होत आहे.
वेस्ट इंडिजची सुरुवात ३५० धावांच्या जवळपास पोहोचेल असे वाटत होते, पण अखेरीस ते ३०० धावांपासून पाच धावांनी दूर राहिले. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यजमानांसाठी पॉवरप्ले कठीण गेला. वेस्ट इंडिजच्या पहिल्या १० षटकांत ८५ धावा देत, भारताला विकेट्स घेता आल्या नाहीत किंवा धावगती रोखता आली नाही. वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांना चांगल्या प्रकारे हाताळले. जॉन कॅम्पबेल आणि जस्टिन ग्रीव्हज यांनी स्फोटक फलंदाजी करत एक मजबूत सलामीची भागीदारी रचली.
मात्र कुलदीप यादवच्या षटकात त्याने विकेट गमावली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावेळी पंचांनी नॉटआऊट दिलं, पण रिव्ह्यूमध्ये ग्रीव्ह्जचा गेम ओव्हर झाला. या विकेटनंतर कुलदीपचं भन्नाट सेलीब्रेशन व्हायरल झाला आहे. त्याच्या भन्नाट जल्लोषावर गिलही हसल्याचे दिसून आले. भारताला पहिले यश मिळेपर्यंत या दोन्ही फलंदाजांनी वेस्ट इंडिजला एका मजबूत स्थितीत आणून ठेवले होते.
Crucial breakthroughs served with a touch of magic ✨
🎥 Watch how Kuldeep Yadav shifted the momentum for #TeamIndia 💙
Updates ▶️ https://t.co/O2cs86p4gq
#INDvWI | @mflone_ | @imkuldeep18 https://t.co/nAt1GOrcW2
— BCCI (@BCCI) September 27, 2026
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण तो व्यर्थ ठरला, कारण जस्टिन ग्रीव्हजने शतक झळकावले. कॅम्पबेल आणि ग्रीव्हज यांनी सलामीला १४३ धावांची भागीदारी करून वेस्ट इंडिजला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. भारताला नव्या चेंडूने बळी घेता आले नाहीत आणि वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी याचा पुरेपूर फायदा घेतला.
कॅम्पबेल ६२ धावांवर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतरही ग्रीव्ह्सने धावांचा वेग कायम ठेवला आणि २८ षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिजची धावसंख्या १६८/१ होती. त्यानंतर ग्रीव्ह्सने फलंदाजी सुरू ठेवत शतक झळकावले. ग्रीव्ह्सने १०४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. मात्र, त्याचा साथीदार केसी कार्टी १३ धावा करून लवकर बाद झाला. कर्णधार शाई होपनेही १२ धावा केल्या.
