Rishabh Pant : ऋषभ पंतसाठी देवदूत ठरलेल्या त्या बस ड्रायव्हरबाबत मोठा निर्णय

| Updated on: Dec 30, 2022 | 11:52 PM

ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) मदतीला बस ड्रायव्हर धावून आला. त्यामुळे पंतला वेळीच उपचार मिळाले. परिणामी अनर्थ टळला. हा बस ड्रायव्हर देवदूतच ठरला.

Rishabh Pant : ऋषभ पंतसाठी देवदूत ठरलेल्या त्या बस ड्रायव्हरबाबत मोठा निर्णय
Follow us on

Rishabh Pant : अनेकदा रस्ते अपघातात अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळत नाही. त्यामुळे परिणामी नको ते होतं. शुक्रवारीची सकाळ प्रत्येक भारतीयाच्या मनाचा थरकाप उडवणारी होती, कारण बातमीही तशीच होती. टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा भीषण अपघात झाला. मात्र सुदैवाने अपघातानंतर पंतला वेळीच मदत मिळाली. पंतच्या मदतीला बस ड्रायव्हर धावून आला. त्यामुळे पंतला वेळीच उपचार मिळाले. परिणामी अनर्थ टळला. हा बस ड्रायव्हर देवदूतच ठरला. या बस ड्रायव्हरबाबत उत्तराखंड पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. (uttarakhand police honored to bus driver and local people who helped to indian cricketer rishabh pant)

शुक्रवारी उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रुडकीजवळ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाला. अपघातात पंतची गाडी दुभाजकाला जाऊन जोरात धडकली. त्यामुळे गाडी काही मीटर घसपटत गेली. त्यानंतर गाडीने पेट घेतला ज्यात गाडी जळून पूर्णपणे खाक झाली. मात्र पंत गाडीतून बाहेर निघाला. त्यानंतर उपस्थित काही स्थानिक तरुणांनी आणि हरियाणा रोडवेजच्या बस चालकाने पोलीस आणि रुग्णवाहिकेला बोलावलं आणि पंतची मदत केली.

हे सुद्धा वाचा

बस चालकाने केलेल्या मदतीचं भरभरुन कौतुक केलं जातंय. हरिद्वारे एसएपींनी चालकांचं खूप कौतुक केलं. चालकाने अपघातानंतर पंतला ओढायला आपली चादर दिली आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. परिणामी यामुळे पंतला नजिकच्या रुग्णालयात दाखल करता आलं. मदत करणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असं या बक्षिसाचं स्वरुप असणार आहे. उत्तराखंड पोलिसांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध केलंय.

पत्रकानुसार, चालक आणि इतर युवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सर्वांचा सन्मान हा केंद्र सरकारच्या ‘गुड सेमेरिटन योजनेनुसार केला जाणार आहे.

पंतचे एमआरआय रिपोर्ट नॉर्मल

ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, पंतचा एमआरआय रिपोर्टमध्ये मेंदू आणि मणक्याचं हाडं सुरक्षित आहे. एमआरआय रिपोर्टनुसार पंतला कोणताही मुका मार लागलेला नाही. मात्र पंतने जिथे जिथे दुखापत झालीय तिथे प्लास्टिक सर्जरी केली आहे. तीव्र वेदना आणि सूजेमुळे टाच आणि गुडघ्याचं एमआरआय स्कॅन हे शनिवारी होण्याची शक्यता आहे.