AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: नाद करतो की काय! वैभवने अंपायरला चॅलेंज केलं, निर्णय बदलायला लावला, Video Viral

वैभव सूर्यवंशी फक्त बॅटिंगमध्येच नाही तर आता DRS मध्येही माहिर झालेले पाहायला मिळाला. दुलीप ट्रॉफीच्या फायनल सामन्यात वैभवने एक डीआरएस घेतला ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Vaibhav Sooryavanshi: नाद करतो की काय! वैभवने अंपायरला चॅलेंज केलं, निर्णय बदलायला लावला, Video Viral
| Updated on: Sep 08, 2026 | 2:55 PM
Share

Vaibhav Sooryavanshi News: वैभव सूर्यवंशी फक्त बॅटिंगमध्येच नाही तर आता DRS मध्येही माहिर झालेले पाहायला मिळाला. दुलीप ट्रॉफीच्या फायनल सामन्यात वैभवने एक डीआरएस घेतला ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्या डावात वैभवला अर्धशतकही पूर्ण करता आलेले नाही. वैभवचा डीआरएसचा निर्णय दुसऱ्यांदा योग्य ठरताना दिसला.

दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाच्या पहिल्या डावात सलामीवीर रिकी भुईविरुद्ध जोरदार अपील करण्यात आले. यष्टीरक्षक कुमार कुशाग्रने पूर्व विभागाचा गोलंदाज मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर रिकी भुईचा झेल घेतला, परंतु पंचांनी अपील फेटाळले. वैभव सूर्यवंशीने आपली भूमिका बजावली. उपकर्णधार म्हणून त्याने आपला कर्णधार, इशान किशन याला डीआरएस घेण्याचा आग्रह केला. वैभवच्या विनंतीवरून इशानने डीआरएस घेतला, ज्यानंतर पंचांनी आपला निर्णय बदलला आणि रिकी भुई बाद झाला.

ही संपूर्ण घटना साऊथ झोनच्या डावाच्या सहाव्या षटकात घडली. साऊथ झोनने १० धावा केल्या होत्या, तेव्हा वैभव सूर्यवंशीच्या चार्तुयमुळे रिकी भुईच्या रूपाने त्यांना पहिला धक्का बसला. ज्याप्रमाणे वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुकेश कुमारला बाद करण्यासाठी योग्य डीआरएस घेतला होता, त्याचप्रमाणे त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट्रल झोनविरुद्ध त्यांची विकेट मिळवण्यासाठी डीआरएसचा वापर केला. वैभवने तो डीआरएस कर्णधार म्हणून घेतला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान, जेव्हा इशान किशनला हाताच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले, तेव्हा वैभव पूर्व विभागाचे कर्णधारपद भूषवत होता. वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीदरम्यान दोन डीआरएस निर्णय घेतले असून, ते दोन्ही अचूक ठरले आहेत. याचा अर्थ डीआरएसमधील त्याचा रेकॉर्ड १०० टक्के आहे.

वैभवने सेंट्रल झोनविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या डावात त्याने ९२ धावा करून ५७ वर्षांचा जुना विक्रम मोडला. दुसऱ्या डावात तो ४० धावांवर बाद झाला. अंतिम सामन्यात वैभव ३७ चेंडूंमध्ये ४४ धावांवर बाद झाला. प्रथम फलंदाजी करताना, ईशान किशनच्या २७० धावांच्या जोरावर ईस्ट झोनने ७०८ धावा केल्या.

Follow Us
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
Pankaj Bhoyar : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या आरोपांमागचं सत्य लवकरच समोर येणार?
तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू...; प्रवीण दरेकरांचा सूचक इशारा
Pravin Darekar On Ramdas Kadam : तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू....; प्रवीण दरेकरांचा रामदास कदमांना सूचक इशारा
मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; AQI तब्बल....
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल....
जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल
Mangesh Sasane : मनोज जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता?
Chandrakant Khaire : मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता? चंद्रकांत खैरेंचा रोख नेमका कोणाकडे?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची