AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची लॉटरी, निवड समितीचं बिग सरप्राईज…, होणार कॅप्टन

मोठी बातमी समोर येत आहे, वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत जो काही खेळ केला आहे, त्यामुळे भारताचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष त्याने आपल्याकडे वेधून घेतलं आहे. याचचं मोठं बक्षिस आता त्याला मिळणार असून, निवड समितीने मोठा निर्णय घेतला आहे.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची लॉटरी, निवड समितीचं बिग सरप्राईज..., होणार कॅप्टन
Vaibhav SuryavanshiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 01, 2026 | 4:28 PM
Share

सध्या क्रिकेटमध्ये एक नाव चांगलंच गाजत आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. अवघं 15 वर्ष वय असलेल्या या खेळाडूने भल्या भल्या गोलंदाजांना आपल्या बॅटच्या जोरावर पाणी पाजलं आहे. समोर कोणताही बॉलर असो आक्रमकता हे आतापर्यंत वैभव सूर्यवंशीच्या खेळीचं वैशिष्ट राहिलं आहे, तो बॉलरवर तुटून पडतो, त्याच्या खेळीमध्ये सिक्सर आणि चौकारांचा पाऊस पडतो. वैभवने आयपीएमध्ये जो काही खेळ केला, त्यामुळे संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागली आणि त्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये देखील जागा मिळाली, टीम इंडियाकडून खेळताना देखील त्याने काही सामन्यांमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. येणाऱ्या काळात क्रिकेटच भविष्य म्हणून वैभव सूर्यवंशीकडे पाहिलं जातं आहे.

दरम्यान वैभव सूर्यवंशीची उपकर्णधारपदी नियुक्ती झाल्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आहे. पूर्व विभागाच्या निवड समितीने दुलीप ट्रॉफीसाठी त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला उपकर्णधार बनवलं आहे. दुलीप ट्रॉफीसाठी इशान किशन हा कर्णधार असणार आहे, तर वैभव सूर्यवंशीवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वैभवने आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन केलं म्हणून किंवा त्याची टीम इंडियात निवड झाली म्हणून त्याची दुलीप ट्रॉफीसाठी उपकर्णधारपदी निवड झालेली नाहीये तर सिलेक्टर आता त्याच्याकडे पूर्ण नेतृत्व सोपवण्याच्या तयारीत आहेत, त्याला कर्णधार बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळेच यावेळी इशान किशन याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीमचा त्याला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. वैभवने मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी कर्णधार पदाच्या जबाबदारीमधील बारकावे शिकावेत अशी निवडकर्त्यांची अपेक्षा आहे.

दरम्यान पूर्व विभाग निवड समितीने दुलीप ट्रॉफीसाठी जो संघ निवडला आहे, त्यामध्ये अभिमन्यु ईश्वरन, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार सारखे अनेक अनुभव खेळाडू असताना देखील वैभव सूर्यवंशीची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, समोर आलेल्या माहितीप्रमाणे भविष्यात त्याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे, त्यासाठी त्याला यावेळी उपकर्णधार बनवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच वैभव सूर्यवंशीची आता कर्णधारपदी निवड होऊ शकते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल