MS Dhoni ने रांचीच्या रस्त्यावर पळवली 65 लाखांची कार, महाराष्ट्राच्या दोन पाहुण्यांना घडवली सफर VIDEO

धोनीच्या नव्या कोऱ्या कारमधून सफर करणारे महाराष्ट्राचे ते दोन पाहुणे कोण?

MS Dhoni ने रांचीच्या रस्त्यावर पळवली 65 लाखांची कार, महाराष्ट्राच्या दोन पाहुण्यांना घडवली सफर VIDEO
MS Dhoni
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 18, 2022 | 5:46 PM

रांची: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेट मैदानाबाहेर दोन खास गोष्टींसाठी ओळखला जातो. एक म्हणजे आपल्या शानदार गाड्या, बाइक. दुसरं ज्यूनियर खेळाडूंची काळजी घेणं. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएल 2023 सीजनसाठी रिटेंशनमुळे चर्चेत आहे. या दरम्यान महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ समोर आलाय. धोनीने चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित आपल्या दोन सहकाऱ्यांना रांचीची सफर घडवली.

आता धोनीने कुठली नवीन कार घेतली?

धोनीने त्याच्या गॅरेजमध्ये हमर, फोर्ड मुस्टांग सारख्या शानदार गाड्या ठेवल्या आहेत. धोनीच्या या कलेक्शनमध्ये आणखी एका नव्या गाडीचा समावेश झालाय. या कारच नाव आहे, किया ईवी 6 (Kia EV6). रांचीच्या रस्त्यावर धोनी ही नवी गाडी फिरवताना दिसला. रस्त्यावर कार आल्यानंतर धोनीच्या फॅन्सची त्या कारवर नजर पडली. धोनीच्या खास मित्रांनीही लक्ष वेधून घेतलं.

धोनीच्या गाडीत महाराष्ट्राचे दोन पाहुणे

टि्वटरवर धोनीच्या एका फॅनने CSK कॅप्टनचा व्हिडिओ पोस्ट केलाय. यात धोनी स्लेटी रंगाच्या आपल्या नव्या कारमध्ये बसताना दिसतोय. धोनीसोबत ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधव यांनी कार राइडचा आनंद घेतला. ऋतुराज आणि केदार दोघेही महाराष्ट्राकडून खेळतात. ऋतुराज गायकवाड सीएसकेकडून खेळतो. केदार जाधव सीएसकेकडून खेळायचा. तो धोनीचा जुना सहकारी आहे. धोनीचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला आहे.

ऋतुराज-जाधव धोनीला भेटण्यासाठी कसे पोहोचले?

सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्राची टीम आपल्या सामन्यांसाठी रांचीमध्ये आहे. ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचा कॅप्टन आहे. केदार जाधवही या टीमचा सदस्य आहे. दोघांनीही धोनीला भेटण्याची संधी दवडली नाही. धोनीने आपल्या नव्या कारमधू रांचीची सफर घडवली.