AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 झेल 3 खेळाडू तरीही अपयश, LIVE सामन्यातील हा VIDEO पाहाच!

या सामन्यात फलंदाजाने जोरात शॉट मारला अतिशय दूर गेलेला चेंडू सीमारेषा पार करणार त्यावेळी तेथे उपस्थित तीन खेळाडूंनी झेल घेण्यासाठी केलेले प्रयत्न पाहण्याजोगे आहेत.

1 झेल 3 खेळाडू तरीही अपयश, LIVE सामन्यातील हा VIDEO पाहाच!
तीन फिल्डर्स एक कॅच पकडण्याचा प्रयत्न करताना
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 9:09 PM
Share

सिडनी: क्रिकेटचा (Cricket) सामना म्हटलंकी त्यात अनेक गोष्टी घडत असतात. चुरशीच्या सामन्यात उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजीसह अनेकदा दमदार क्षेत्ररक्षणही पाहायला मिळते. पण कधी कधी क्षेत्ररक्षणादरम्यान एखादा अप्रतिम प्रयत्न हा कधी मजेशीर प्रयत्नात बदलतो हे सांगता येत नाही. असाच किस्सा ऑस्ट्रेलियातील एका क्रिकेट सामन्यात घडला आहे. याठिकाणी सीमारेषेवरील एक एक झेल पकडण्यासाठी गेलेले तीन फिल्डर झेल पकडण्यात अपयशी होतात. पण या तिघांनी केलेला अयशस्वी प्रयत्न चेहऱ्यावर हसू आणतो.

तर हा संपूर्ण किस्सा ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या मार्श कपमध्ये घडला. एडिलेड येथे साउथ ऑस्ट्रेलिया आणि क्वींन्सलँड यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात साउथ ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी घेतली होती. त्यावेळी कर्णधार ट्रेविस हेडने बनवलेल्या 230 धावांच्या जोरावर संघाने 391 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. दरम्यान डकवर्थ लुइस नियमानुसार क्वीन्सलँडला 44 ओवरमध्ये 380 धावा करायच्या होत्या पण 40.3 ओवरमध्ये त्यांचा संघ 312 धावांवर सर्वबाद झाला आणि ते 67 धावांनी सामना पराभूत झाले.

1 कॅच, 3 फील्डर, तरीही अपयश

सामन्यात क्वीन्सलँडचा संघ फलंदाजी करताना 37वी ओवर सुरु होती. 7 विकेट्सवर 284 धावा झाल्या होत्या. त्याचवेळी मायकल नासेरने एक दमदार शॉट खेळला. चेंडू थेट सीमारेषेकडे जाऊ लागला. त्याठिकाणी साउथ ऑस्ट्रेलियाचे एक नाही दोन नाही तर तीन खेळाडू होते. त्या तिघांनी चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण पहिल्याच खेळाडूचा पाय सीमारेषेला लागला होता. पण त्यानंतरही इतर दोघांनी प्रयत्न केला खरा पण तिघांनीही सीमारेषेपलीकडे जाऊनच चेंडू पकडला. ज्यामुळे पंचानी षटकार घोषित केला. तर हा मजेशीर व्हिडीओ तुम्हीही पाहाच…

इतर बातम्या

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…

‘विराट कोहली एक अपयशी कर्णधार’, आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला

RCB Captiancy: ‘विराट कर्णधार म्हणून अपयशीच’, 3 देशांच्या 4 दिग्गज क्रिकेटपटूंचे टीकास्त्र

(Video of 3 fielders tries to grab 1 catch see this funny kind of amazing Live cricket match video in south australia vs queensland)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.