AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिव्हिलियर्स नव्हे ‘हा’ खेळाडू RCB चं भविष्य; गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला संघात कायम ठेवण्याच्या शक्यतेबद्दलही गंभीरने मत व्यक्त केले. या हंगामात या फलंदाजाने 15 सामन्यांमध्ये 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

डिव्हिलियर्स नव्हे 'हा' खेळाडू RCB चं भविष्य; गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य
Gautam Gambhir
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 13, 2021 | 7:27 PM
Share

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal Challengers Bangalore) संघ आयपीएलच्या इतिहासातील त्या संघांपैकी एक आहे ज्या संघाने एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही. हा संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहचला पण एकदाही अंतिम फेरी जिंकू शकला नाही. 2009 मध्ये, हा संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला पण डेक्कन चार्जेसकडून पराभूत झाला. 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने अंतिम फेरीत या संघाचा पराभव केला. मग हा संघ 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहचला पण जेतेपद जिंकू शकला नाही. पुन्हा एकदा हा संघ हैदराबादकडून पराभूत झाला. 2013 पासून विराट कोहलीने या संघाचे कर्णधारपद भूषवले पण त्याला जेतेपद मिळवता आले नाही. IPL-2021 हा RCB मध्ये कर्णधार म्हणून त्याचा शेवटचा हंगाम होता. एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीचा पराभव केला आणि या मोसमातील बँगलोरचा प्रवास संपवला. (‘He is not future’: Gambhir on whether RCB should retain AB De Villiers)

पुढील वर्षी IPL चा मोठा लिलाव आहे. याआधी, आरसीबीसमोर मोठे आव्हान आहे की, त्यांची टीम कशी तयार करावी. उर्वरित संघांप्रमाणे, आरसीबी बदलाच्या टप्प्यातून जाईल कारण प्रत्येक फ्रँचायझीला फक्त तीन खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे. कोलकात्याला दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार गौतम गंभीरने आरसीबीने पुढील हंगामात कोणाला संघात कायम ठेवावे याबाबत सांगितले आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या एका कार्यक्रमात बोलताना गंभीरने सांगितले की. “आरसीबीने कोहली, मॅक्सवेल आणि युझवेंद्र चहल या तिघांना पुढील हंगामासाठी संघात कायम ठेवावे. गंभीर म्हणाला की, मला यात एक गोष्ट जोडायची आहे की, हर्षल पटेल आणि चहल यांच्यामध्ये एकाची निवड करता येईल. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला संघात कायम ठेवायचे हे त्यांच्यावर अवलंबून आहे.”

डिव्हिलियर्सबद्दल गंभीर म्हणाला…

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला संघात कायम ठेवण्याच्या शक्यतेबद्दलही गंभीरने मत व्यक्त केले. या हंगामात या फलंदाजाने 15 सामन्यांमध्ये 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली पण यूएईत खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यात जास्त यश मिळवू शकला नाही. आरसीबीने डिव्हिलियर्सला संघात कायम ठेवू नये का, असे विचारले असता तो म्हणाला, “होय, कारण मला वाटते की ते ग्लेन मॅक्सवेलला संघात कायम ठेवतील. कारण मॅक्सवेल संघाचं भविष्य आहे डिव्हिलियर्स नाही.”

कोहलीच्या घोषणेमुळे मोठा फरक पडला

गंभीरने म्हटले आहे की, विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय संघातील खेळाडूंसाठी चांगला नव्हता आणि यामुळे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यापासून त्यांचे लक्ष हटले. गंभीर म्हणाला की, आरसीबीने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत कोहली आपली घोषणा पुढे ढकलू शकला असता. स्पर्धेच्या शेवटी तो हे करू शकला असता. तो म्हणाला, “मला वाटते की, त्याला जर कर्णधारपद सोडायचे होते, तर तो स्पर्धेनंतर त्याची घोषणा करू शकला असता. जेव्हा त्याने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली, तेव्हा अशी परिस्थितीदेखील नव्हती की, हा संघ क्वालिफाय होणार नाही. मला वाटते की, त्याने स्पर्धा संपल्यानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला असता तर बरे झाले असते.”

इतर बातम्या

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…

‘विराट कोहली एक अपयशी कर्णधार’, आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला

भारतीय संघाच्या T20 World Cup च्या वेळापत्रकात बदल, महत्त्वाच्या संघासोबतचा सामना रद्द!

(‘He is not future’: Gambhir on whether RCB should retain AB De Villiers)

Follow Us
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा