AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: कॉकरोच जनता पार्टीला पाठींबा, पण राज ठाकरे जंतर-मंतरवर का गेले नाहीत? सांगितलं कारण

Raj Thackeray: काल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जंतर मंतर येथे गेले होते. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यातील इतर बडे नेते देखील दिसले. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला का गेले नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे

Raj Thackeray: कॉकरोच जनता पार्टीला पाठींबा, पण राज ठाकरे जंतर-मंतरवर का गेले नाहीत? सांगितलं कारण
Raj ThackerayImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 1:16 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने दिल्ली येथील जंतर-मंतर येथे आंदोलन पुकारले. त्यांनी जंतर मंतर ते संसदेकडे धडक मोर्चा काढला. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले असून विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले. या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. काल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जंतर मंतर येथे गेले होते. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यातील इतर नेते देखील दिसले. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे का गेले नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता राज ठाकरेंनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत यामागचे कारण सांगितले आहे.

राज ठाकरे दिल्लीत का गेले नाहीत?

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांना जंतर मंतर येथे का गेले नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत, “अरे मी जाणारच होतो. माझी तब्येत बरी नाही” असे राज ठाकरे म्हणाले.

इथे दिल्ली सारखं करण्याचा प्रयत्न केला तर …

सुरुवातीलाच चर्चा करायला हवी होती. हे झालं नसतं. आता आंदोलन घराघरात पोहोचलं. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेलं. शेतकरी आंदोलन झालं. तेव्हा त्यांना चर्चेला बोलावलं नव्हतं. कारण ते आंदोलन घराघरात गेलं नव्हतं. आता मात्र, त्यांच्या लक्षात आलंय आपल्या अंगलट आलं. त्यामुळे सारवासारव करत आहे. शेतकरी आंदोलन आणि मणिपूरच्यावेळी त्यांनी ट्विट केलं होतं का. २६व तारखेला असे कोणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर फटकवून काढला. शांततेने मोर्चा होईल. कोणताही गोंधळ नसेल. इथे दिल्ली सारखं करण्याचा प्रयत्न केला तर आमचे लोकं सोडणार नाही असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, हा विषय मतपेटीचा नाही. हा न्यायाचा विषय आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. समजून घ्या. इथे मतपेटीचा विषय येतो कुठे. ज्या प्रकारे सत्ता राबवली जाते त्याचा राग प्रत्येक राज्या राज्यातून बाहेर येतो ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्याविरोधात तुम्ही काहीही बोलला तर तुम्ही देशद्रोही असता. राष्ट्रविरोधी असता.

Follow Us
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा