AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Hazare Trophy | श्रेयसची शतकी खेळी, शार्दुलचा भेदक मारा, मुंबईचा राजस्थानवर 67 धावांनी विजय

राजस्थानला (Rajasthan) पराभूत करत मुंबईने (Mumbai) विजयी चौकार लगावला.

Vijay Hazare Trophy | श्रेयसची शतकी खेळी, शार्दुलचा भेदक मारा, मुंबईचा राजस्थानवर 67 धावांनी विजय
राजस्थानला (Rajasthan) पराभूत करत मुंबईने (Mumbai) विजयी चौकार लगावला.
| Updated on: Feb 27, 2021 | 11:50 PM
Share

जयपूर : शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) भेदक गोलंदाजी आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer)शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडकात (Vijay Hazare Trophy 2020-21) राजस्थानवर (Rajasthan) 67 धावांनी शानदार विजय मिळवला. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 50 ओव्हरमध्ये 318 धावांचे आव्हान दिले होते. पण मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानला 42.2 ओव्हरमध्ये 250 धावांवर ऑल आऊट केलं. त्यामुळे मुंबईचा 67 रन्सनी विजय झाला. मुंबईकडून ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर राजस्थानकडून महिपाल लोमरुरने सर्वाधिक 76 धावा केल्या. (Vijay Hazare Trophy 2020 21 shreyas iyer hit century and shardul thakur take 4 wickets mumbai beat rajasthan by 67 runs)

खराब सुरुवात, त्यानंतर शतकी भागीदारी

विजयी आव्हानासाठी मैदानात आलेल्या राजस्थानची निराशाजनक सुरुवात राहिली. राजस्थानने पहिल्या 2 विकेट्स लवकर गमावल्या. यामुळे 32-2 अशी स्थिती झाली. त्यानंतर मनेंदर सिंग आणि महिपाल रोमरुर या दोघांनी राजस्थानच्या विजयाच्या पल्लवित ठेवल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. ही जोडी मुंबईसाठी डोकेदुखी ठरत होती. आकाश पारकरने ही जोडी फोडली. आकाशने मनेंदरला 40 धावांवर पायचीत केलं.

मुंबईच्या गोलंदाजांचा भेदक मारा

यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या एकाही फलंदाजाला मैदानात सेट होऊन दिले नाही. ठराविक अंतराने मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानला धक्के देत विजयी आव्हानाच्या खूप धावांआधी रोखले. मुंबईने राजस्थानला 250 धावांवर ऑल आऊट केलं. राजस्थानकडून लोमरुरने 69 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर मुंबईकडून शार्दुलने 8 ओव्हरमध्ये 50 धावा देत महत्वपूर्ण 4 विकेट्स घेतल्या. तर धवल कुलकर्णीने 3 तसेच प्रशांत सोलंकीने 2 बळी घेत शार्दुलला चांगली साथ दिली. आकाशने 1 पण निर्णायक क्षणी महत्वाची विकेट घेतली.

मुंबईची बॅटिंग

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मुंबईकडून कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार शतकी खेळी केली. श्रेयसने 103 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह तडाखेदार 116 धावा केल्या. तर सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि पृथ्वी शॉने अनुक्रमे 38 आणि 36 धावा केल्या. श्रेयसच्या शतकाच्या जोरावर मुंबईने 7 विकेट्स गमावून 317 धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून एस के शर्माने 3 विकेट्स घेतल्या. अभिमन्यू लांबाने मुंबईच्या 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. तर रवी बिश्नोई आणि लोमरुरने प्रत्येकी 1 विकेट मिळवली.

मुंबईचा विजयी ‘चौकार’

मुंबईने या विजयासह विजय हजारे करंडकातील सलग चौथा विजय साजरा केला. मुंबई डी ग्रृपमधील पॉइंट्सटेबलमध्ये 16 पॉइंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy | IPL च्या AUCTION मध्ये अनसोल्ड, विजय हजारे स्पर्धेत 6 षटकारांसह खणखणीत शतक, फ्रँचायजींना चोख उत्तर

आधी लोकल, आता कारने 10 तासात 700 किमी प्रवास, शार्दूल ठाकूरच्या जिद्दीला सलाम!

(Vijay Hazare Trophy 2020 21 shreyas iyer hit century and shardul thakur take 4 wickets mumbai beat rajasthan by 67 runs)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या