Vijay Hazare Trophy | IPL च्या AUCTION मध्ये अनसोल्ड, विजय हजारे स्पर्धेत 6 षटकारांसह खणखणीत शतक, फ्रँचायजींना चोख उत्तर

Vijay Hazare Trophy | IPL च्या AUCTION मध्ये अनसोल्ड, विजय हजारे स्पर्धेत 6 षटकारांसह खणखणीत शतक, फ्रँचायजींना चोख उत्तर
प्रेरक मांकडने (Prerak Mankad) ने विजय हजारे करंडकात ( Vijay Hazare Trophy 2021) एकूण 130 चेंडूंच्या मदतीने 6 सिक्स आणि 16 चौकारांच्या मदतीने 174 धावांची धमाकेदार खेळी केली.

प्रेरक मांकडने (Prerak Mankad) ने विजय हजारे करंडकात ( Vijay Hazare Trophy 2021) एकूण 130 चेंडूंच्या मदतीने 6 सिक्स आणि 16 चौकारांच्या मदतीने 174 धावांची धमाकेदार खेळी केली.

sanjay patil

|

Feb 27, 2021 | 4:25 PM

कोलकाता : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL Auction 2021) नुकताच लिलाव पार पडला. या लिलावात देशांतर्गत स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध फ्रँचायजींनी आपल्या ताफ्यात घेतलं. काही खेळाडूंना बेस प्राईज मिळाली. तर काही खेळाडूंना अपेक्षापेक्षा जास्त रक्कम मिळाली. तर काही खेळाडूंनी कोट्यावधींची उड्डाणं घेतली. मात्र काही खेळाडू हे दुर्देवाने अनसोल्ड राहिले. दमदार कामगिरी करुनही या खेळाडूंना कोणीही खरेदीदार मिळाला नाही. पण अनसोल्ड राहिलेले हे खेळाडू सुरु असलेल्या विजय हजारे करंडकात (Vijay Hazare Trophy) धमाकेदार खेळी करत आहेत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. सौराष्ट्रच्या (Saurashtra) प्रेरक मांकडने (Prerak Mankad) खणखणीत शतकी खेळी करत फ्रँचायजींना आपल्या बॅटने उत्तर दिलं आहे. (Saurashtra prerak mankad score century in vijay hazare trophy against Chandigarh)

6 षटकारांच्या मदतीने शानदार शतक

सध्या देशांतर्गत मोठ्या स्पर्धेपैकी एक असलेली विजय हजारे स्पर्धा 2020-21 सुरु आहे. या स्पर्धेत सौराष्ट्र विरुद्ध चंडीगढ यांच्यातील सामन्यात प्रेरनने शतक लगावलं आहे. चंडीगढने टॉस जिंकून सौराष्ट्रला बॅटिंगसाठी भाग पाडले. बॅटिंगसाठी मैदानात आलेल्या प्रेरकने सुरुवातीपासून आक्रमकपणे फलंदाजी केली. प्रेरकने चौकार षटकार खेचत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यासह त्याने शानदार शतक लगावलं. प्रेरकने या सामन्यात एकूण 130 चेंडूंच्या मदतीने 6 सिक्स आणि 16 चौकारांच्या मदतीने 174 धावांची धमाकेदार खेळी केली. प्रेरकच्या या खेळीच्या जोरावर सौराष्ट्रने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 388 धावा केल्या.

जाडेजा आणि वासवाडासोबत शतकी भागीदारी

फलंदाजीसाठी आलेल्या सौराष्ट्रने 55 धावांवर 2 विकेट्स गमावल्या. यानंतर प्रेरकने विश्वराज जाडेजासोबत तिसऱ्या विकेटसाठी 110 धावांची शतकी भागीदारी केली. या भागीदारीमुळे सौराष्ट्र मजबूत स्थितीत पोहचली. सौराष्ट्रला 166 धावांवर तिसरा धक्का बसला. विश्वराज 53 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतकी खेळी केली.

जाडेजा बाद झाल्यानंतर प्रेरकला अरप्रित वासवाडाने चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 168 धावांची दिडशतकी भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर सौराष्ट्रने 300 धावांचा टप्पा ओलांडला. वासवाडाने 52 चेंडूत 5 फोर आणि 2 सिक्ससह 71 धावांची खेळी केली.

संबंधित बातम्या :

India vs England 4th Test | चौथ्या कसोटीतून ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहची तडकाफडकी माघार

PSL 2021 | चोप चोप चोपला, ‘स्टेन गन’ डेलच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी, एकाच ओव्हरमध्ये लुटल्या 21 धावा

(Saurashtra prerak mankad score century in vijay hazare trophy against Chandigarh)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें