
मुंबई: विराट कोहलीने जवळपास तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर शतक झळकावलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध विराट कोहलीने 122 धावांची शतकी खेळी केली. करीयरमधील त्याचं हे 71 व शतक आहे. या खेळीने विराटने सेंच्युरीचा दुष्काळ संपवला. या इनिंगमुळे पुन्हा एकदा विराट कोहलीच्या 100 सेंच्युरीची अपेक्षा निर्माण झाली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीबद्दल भाष्य केलं आहे. हो, हे असं घडू शकतं, पण विराटसाठी हे लक्ष्य कठीण असेल.
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच आव्हान सुपर 4 फेरीतच संपुष्टात आलं. खरंतर टीम इंडियाकडे जेतेपदाच प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. विजेतेपद हुकल्याची खंत काही प्रमाणात कोहलीच्या शतकामुळे कमी झाली. कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये आपलं 70 व शतक झळकावलं होतं. त्यावेळी कोणीही विचार केला नव्हता की, 71 व्या शतकासाठी कोहलीला 1021 दिवसापर्यंत वाट पहावी लागेल. सचिनचा 100 शतकांचा विक्रम कोहली मोडेल, ही अपेक्षा त्यामुळे धुसर होत चालली होती. आता मात्र ही अपेक्षा पुन्हा जिवंत झाली आहे.
काही दिवसांपासून शोएब अख्तर सातत्याने विराट कोहलीच समर्थन करत होता. शतकानंतर शोएबने कोहलीला शुभेच्छा दिल्या व आनंद व्यक्त केला. कोहलीसाठी उर्वरित 29 शतकांचा टप्पा गाठणं सोप नसेल, असं शोएबने म्हटलं आहे. कोहलीने 100 शतकं झळकावली, तर निश्चितच महान क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होईल. आपल्या युट्यूब चॅनलवर शोएब हे म्हणाला.
“उरलेली 29 शतकं कोहलीला संपवून टाकतील. हा टप्पा गाठताना त्याच्या शरीरातील हाड मोडतील. पण त्याला त्याचा खेद नसेल. भावनात्मक दृष्टया तो थकून जातील. पण त्याने 29 सेंच्युरी झळकावण आवश्यक आहे. हीच 29 शतकं त्याला महान क्रिकेटपटू बनवतील” असं शोएब म्हणाला.
अफगाणिस्तान विरुद्ध शतक झळकावल. त्यावेळी पहिल्या 50 धावा करताना कोहलीचा तो जुना फॉर्म दिसला नाही. पण नंतरच्या 50 धावा कोहलीने आपल्या मर्जीने बनवल्या, असं अख्तर म्हणाला.