Virat Kohli Bat of 71st Century : ०१ कोटी रूपये दिले तर…कोहलीच्या ७१ व्या शतक ठोकलेल्या बॅट घेऊन पाकिस्तानी चाहता काय म्हणाला…
सलाउद्दीन हा पाकिस्तानमध्ये राहत असला तरी त्याचे अनेक भारतीय खेळाडू फॅन आहेत. सलाउद्दीला शतक केलेल्या बॅटचा संग्रह करण्याचा छंद आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी तसेच भारताचे खेळाडू युवराज सिंग, विरेन्द्र सेहवाग यांच्या देखील शतक केलेल्या बॅट त्याच्या संग्रही आहे.

दुबई : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहली (viratkohli) पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे. नुकतेच त्याने ७१ वे शतक ठोकून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे. जवळपास चार महिन्यापासून त्याने एकही शतक केलेले नव्हते त्यामुळे त्याच्यावर टीका होत होती. पण १०१ धावांनी भारतीय टीमला ( Indian Team ) विजय मिळवून देत नाबाद १२२ धावा काढल्या. मात्र, याचवेळी शतक केलेली बॅट त्याने सलाउद्दीन नावाच्या एका फॅनला भेट म्हणून दिली. विशेष म्हणजे कोहलीचा तो पाकिस्तानी (Pakistan) फॅन आहे. याचवेळी विराट कोहलीने त्या बॅटवर स्वतःची सही केली होती. त्यामुळे या चाहत्याला मोठा आनंद झाला होता. याचवेळी लाखो रुपयांना सलाउद्दीनकडे या बॅटची मागणी होऊ लागली होती. मात्र, त्याने जे काही उत्तर आणि माहिती दिली ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
सलाउद्दीन हा पाकिस्तानमध्ये राहत असला तरी त्याचे अनेक भारतीय खेळाडू फॅन आहेत. सलाउद्दीला शतक केलेल्या बॅटचा संग्रह करण्याचा छंद आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी तसेच भारताचे खेळाडू युवराज सिंग, विरेन्द्र सेहवाग यांच्या देखील शतक केलेल्या बॅट त्याच्या संग्रही आहे.
आशिया कप २०२० मध्ये शेवटच्या मॅचमध्ये विराट कोहलीने शतक केले होते. नाबाद १२२ धावा त्याने काढल्या होत्या. यानंतर त्याने ही बॅट पाकिस्तानी फॅन सलाउद्दीनला सही करून भेट दिली. पण याच बॅटला लाखों रुपयांची मागणी केली जात असतांना भेट मिळालेल्या चाहत्याने मोठा खुलासा करून टाकलाय.
मित्रांकडून ४० लाखांपर्यंत या बॅटची मागणी करण्यात आली होती. यावेळी त्याने बॅट चा मि संग्रह करत असतो. ती विकण्यासाठी नाहीये. लाख रुपये काय करोडो रुपये दिले तरी मी ती बॅट देऊ शकणार नाही असे म्हणत बॅट विकत घेऊ पाहणाऱ्या अनेक चाहत्यांना मागणीला ब्रेक लावला आहे.
